Breaking-newsक्रिडा

जान्हवी पवार, स्वराज शिंदे यांचे विजय

पुणे – जान्हवी बाबाराव पवार आणि स्वराज अविनाश शिंदेयांनी 9 वर्षांखालील गटातील इंडियन राऊंडमध्ये प्रथम क्रमांक मिळवताना येथे सुरु असलेल्या पुणे महापौर चषक धनुर्विद्या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले. येथे सुरु असलेल्या महापौर चषक धनुर्विद्या स्पर्धेत 9, 14, 17, 19 वर्षांखालिल गटामध्ये इंडियन, रिकर्व्ह आणि कपांऊंड प्रकारात होत असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 9 वर्षांखालिल मुलींच्या गटातील इंडियन राऊंड प्रकारातील सामन्यांमध्ये जान्हवी पवारने 631 गुणांसह पहिला क्रमांक पटकावला. तर, राजनंदन बोडकेने दुसरा आणि राधिका चव्हानने तिसरा क्रमांक पटकावला. तर, मुलांच्या गटात स्वराज शिंदेने 676 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. तर, युवराज भोसले ने द्वितिय आणि परिस गांधीने तिसरा क्रमांक पटकावला.

तर, 14 वर्षांखालिल मुलिंच्या गटातील इंडियन राऊंड प्रकारातील अनुश्री चांदगुडीने 604 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. तर, स्वानंदी बनसुडेने द्वितिय तर वैष्णवी पवारने तृतीय क्रमांक मिळवला. तर, मुलांच्या गटात आनंद जगतापने 653 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तर, अनिकेत कातखडेने द्वितिय तर वेदांत दुधानेने तृतीय क्रमांक पटकावला. तर, 17 वर्षांखालिल मुलींच्या गटातील इंडियन राऊंड प्रकारात अनिषा कोंडेने 580 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. तर, नमिता पासलकरने द्वितिय आणि खुशी गोळेने तृतीय क्रमांक पटकावला.

तर, मुलांच्या गटात विशाल दुमनेने 636 गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. तर, आयुष पोकळेने द्वितिय तर, संकेत निंगुणेने तृतीय क्रमांक मिळवला. तर, 19 वर्षांखालील मुलांच्या इंडियन राऊंड प्रकारात सोहम धनवडेने प्रथम तर, अमोल बिरादार ने द्वितीय आणि रोशन गादरीने तृतीय क्रमांक पटकावला. तर, मुलींच्या गटात नताशा दुमनेने प्रथम तर, प्रियंका खिंडरेने द्वितिय क्रमांक पटकावला. तर, खुल्या गटात झालेल्या इंडियन प्रकारात शैलेश कोरेने प्रथम क्रमांक पटकावला. तर, गौरव महाजनने द्वितिय आणि सुधीर पाटीलने तृतीय क्रमांक पटकावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button