आयपीएल 2020 ची तारीख निश्चित… सामन्याची वेळ आणि डबल हेडर मुकाबला यामध्ये बदल होण्याची शक्यता…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/new-26.png)
इंडियन प्रीमिअर लीगचा म्हणजेच आयपीएल 2020 तील हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही महिने शिल्लक आहेत. या हंगामासाठी कोलकाता येथे महिन्याभरापूर्वी खेळाडूंचा लिलाव झाला. सहभागी संघांनी तोडीसतोड खेळाडूंची निवड करून 2020च्या जेतेपदासाठी दंड थोपटले आहेत. या लीगसाठी सर्वकाही सेट झालं आहे, मात्र स्पर्धेची तारीख अजूनही गुलदस्त्यातच आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/884997-twitter-7-1024x576.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/1-3-1024x520.png)
पण आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची अंतिम तारीख जाहीर केली नसली तरी ती तारिख ठरली असून त्याची लवकरच घोषणा करण्यात येणआर असल्याचं म्हटलं जात आहे. आयपीएलचा यंदाचा हंगाम 29 मार्चपासून सुरू होणार असून अंतिम सामना 24 मे रोजी मुंबईत होणार आहे. यंदाची लीग ही 45 एवजी 57 दिवसांची खेळवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. यंदाच्या लीगमध्ये काही बदल पाहायला मिळतील, असे संकेत दिले जात होते. त्यात मुख्य म्हणजे सामन्याची वेळ आणि डबल हेडर मुकाबला, हे मुद्दे होते.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/2-2.png)
”अजून संपूर्ण वेळापत्रक तयार झालेले नाही. यंदाची लीग 29 मार्चला सुरू होणार असून अंतिम सामना 24 मे रोजी खेळवण्यात येईल. यंदाची लीग ही 45 दिवसांपेक्षा अधिक काळ चालणारी आहे. त्यामुळे एका दिवसाला एक सामना खेळवण्यास काहीच हरकत नाही,”अशी माहिती मिळतेय. त्याचसोबत सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची गैरसोय होऊ नये यासाठी सार्वजनिक वाहतूक सुरू असेपर्यंत सामना संपवून प्रेक्षकांना घरी जाण्यास कोणतिही अडचण येणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे सामना 7.30 वाजता सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे… तसेच यंदाच्या लीगमध्ये ज्या दोन मुद्द्यांना घेऊन बदल करायचा विचार सुरु आहे ते बदल खऱच होणार का हे सामान्यांच्याच वेळी समजेल…