पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण बॉम्बस्फोट, २४ जण मृत्यूमुखी

Pakistan Balochistan Bomb Blast | पाकिस्तानच्या बलुचिस्तान येथे क्वेटा रेल्वे स्थानकावर शनिवारी (दि. ९ नोव्हेंबर) भीषण बॉम्बस्फोट झाला असून यात २४ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर ४० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जाते. प्राथमिक तपासानुसार ही घटना आत्मघातकी स्पोटाची असल्याचा अंदाज क्वेटाचे पोलीस अधीक्षक मोहम्मद बलोचवस यांनी पीटीआयशी बोलताना व्यक्त केला. बलोच लिबरेशन आर्मी (BLA) यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

क्वेटा रेल्वे स्थानकाच्या तिकीट बुकिंग कार्यालयाजवळ बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेस ट्रेनमध्ये बसण्यासाठी अनेक प्रवाशी प्लॅटफॉर्मवर एकत्र जमले होते, त्यावेळीच हा बॉम्बस्फोट झाला. पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. घटनास्थळाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर ते म्हणाले की, इथे शेकडो लोक उपस्थित होते. या स्फोटामुळे प्लॅटफॉर्मच्या छताचेही नुकसान झाले आहे.






