माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल
चतुःश्रृंगी पोलीसांकडून अटकेची प्रक्रिया सुरु
पुणे | प्रतिनिधी
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव व इषा झा यांच्या विरोधात चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंध परिसरात एका व्यक्तीला जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल करण्यात आलं. खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आता चतुर:श्रुंगी पोलिसांनी त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तक्रारदार यांचे आई आणि वडील हे सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून औंध येथून ब्रेमन चौकाकडे जाणार्या रस्त्यावरून संघवी नगरकडे जात होते. त्यावेळी हर्षवर्धन यांनी चारचाकीचा दरवाजा अचानकपणे उघडला. त्यामुळे अपघात झाला. त्याबाबत चड्डा यांच्या वडिलांनी हर्षवर्धन जाधव यांना जाब विचारला. चड्डा यांच्या वडिलांनी त्यांचे हार्टचे ऑपरेशन झाले आहे हे देखील जाधव यांना सांगितले. त्यानंतर देखील आरोपींनी संगनमत करून चड्डा यांच्या आई आणि वडिलांच्या छातीवर आणि पोटावर लाथा मारल्या. या प्रकरणी चड्डा यांनी तक्रार दिल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव आणि इषा झा यांना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.





