आयपीएलमध्ये 10 संघ खेळणार, BCCI च्या एजीएम बैठकीत निर्णय
अहमदाबाद – आता 2022 पासून आयपीएलमध्ये 10 संघ खेळणार आहेत. अहमदाबाद येथे आज झालेल्या बीसीसीआयच्या एजीएम बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत 8 संघ खेळत आहेत.
दहा संघांचे आयपीएलमध्ये 94 सामने असतील ज्यासाठी सुमारे अडीच महिने लागणार आहेत. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रकारवर होण्याची शक्यता आहे.
वाचा :-Drugs case: अर्जुन रामपालला अटक होण्याची शक्यता
यासह आयपीएलच्या संपूर्ण कालावधीसाठी दिग्गज परदेशी खेळाडूंची उपलब्धता सुनिश्चित करणेही आवश्यक आहे. प्रसारणाची रक्कम दर वर्षी 60 सामन्यांसाठी असते. आता पुन्हा नव्याने याचं नियोजन करावे लागणार आहे. सध्या स्टार इंडियाने सन 2018-2022 दरम्यानच्या कालावधीसाठी 16,347.50 कोटी रुपये दिले आहेत. ही किंमत दरवर्षी होणाऱ्या 60 सामन्यांसाठी आहे.
गौतम अदानी आणि संजीव गोएंका (माजी फ्रेंचायझी राइझिंग पुणे सुपरगिजंट्सचे मालक) ही काही मोठी नावे आहेत ज्यांना संघ खरेदी करण्यात रस आहे.





