Breaking-newsक्रिडा
आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूला विराटचा धोबीपछाड, विंडीजविरुद्ध विजयात बजावला मोलाचा वाटा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/VIRAT-KOHLI-Frame-copy-2.jpg)
कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा-लोकेश राहुल यांनी झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात विंडीजवर ४ गडी राखून मात केली आहे. विंडीजने विजयासाठी दिलेलं ३१६ धावांचं आव्हान भारतीय संघाने आक्रमक फलंदाजीच्या जोरावर पूर्ण केलं. विराट कोहलीने या सामन्यात निर्णायक अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावलेली आहे.
विराट कोहलीने ८१ चेंडूत ९ चौकारांच्या सहाय्याने ८५ धावा केल्या आहेत. तर या खेळीदरम्यान विराटने आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिजला मागे टाकलेलं आहे.