पिंपरी / चिंचवडपुणेमनोरंजन

‘भावना’ लघुपटाला गोल्डन ईगल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये स्पेशल ज्युरी अवॉर्ड

पिंपरी l प्रतिनिधी

‘वर्किंग वूमन’ या विषयावर आधारित असलेल्या ‘भावना’ या लघुपटाला (शॉर्टफिल्म) गोल्डन ईगल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळाला आहे. रेडबड मोशन पिक्चरने हा लघुपट बनवला आहे. याचे लेखन, दिग्दर्शन आणि स्क्रीनप्ले अरविंद भोसले यांनी केले आहे. त्यांचा हा चौथा लघुपट आहे.

या शॉर्ट फिल्मच्या केंद्रस्थानी काम करणा-या महिला आहेत. त्यांना येणा-या अडचणी या माध्यमातून सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न भोसले यांनी केला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत महिला काम करतात. किचन, ऑफिस, मुलांचे संगोपन, घरातील जबाबदा-या या प्रत्येक बाबतीत महिलांची भूमिका महत्वाची आहे.

महिला त्यांना येणा-या अडचणी, त्यांना होणारा त्रास सहसा कुणाला सांगत नाहीत. पण त्यांच्या भावनांना जाणून घेणं समाज, कुटुंब म्हणून आपली जबाबदारी आहे. प्रत्येक कुटुंबाने कुटुंबातील स्त्रीची भूमिका, तिची मनस्थिती आणि तिच्या भावना जाणून घेणं गरजेचं आहे. तिला सपोर्ट करणं गरजेचं आहे. महिला सशक्तीकरणाचा एक चांगला संदेश या शॉर्टफिल्म मधून देण्यात आला आहे.

9 जानेवारी 2022 रोजी ही शॉर्टफिल्म युट्युबवर प्रदर्शित केली जाणार आहे. या शॉर्ट फिल्मला गोल्डन ईगल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये स्पेशल ज्युरी अवॉर्ड (बेस्ट इंडियन शॉर्ट फिल्म) मिळाला आहे. निर्मिती युवराज टावरे, मनोज गायकवाड, विलास जेऊरकर, अजय पुजारी यांनी केली आहे. सहनिर्माते सतीश लिंगाडे आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button