breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

मुंबईतील कार्यक्रमात सोनू निगमला धक्काबुक्की; स्वत: सोनू निगमने सांगितले, म्हणाला..

ठाकरे गटातील आमदाराच्या मुलाकडून सोनू निगमला धक्काबुक्की?

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी संध्याकाळी मुंबईतील चेंबूर परिसरात ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्यावतीने आयोजित फेस्टिवलमध्ये सोनू निगम उपस्थित होता. त्यावेळी सेल्फी घेण्याच्या वादातून आमदाराच्या मुलाची सोनू निगम आणि त्याच्या टीमसोबत झटापट झाली.

सोनू परफॉर्म करत असताना स्थानिक आमदारानं सोनूची टीम मॅनेजर सायरासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. आमदाराच्या मुलाला सोनू निगमसोबत फोटो काढायचा होता, म्हणून तो स्टेजवर चढला. परंतु सोनू टीमने त्याला मज्जाव केला असता स्वप्निल व त्याचे कार्यकर्ते भडकले.

सोनू स्टेजवरून खाली उतरत असताना त्याने गायकाला स्टेजच्या मागच्या पायऱ्यांकडे ढकलले. या प्रकरणी पोलिसांनी स्वप्निल फातर्पेकर याच्यावर गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे अशी माहिती झोन ६ चे डीसीपी हेमराज सिंग राजपूत यांनी दिली.

सोनू निगम म्हणाला, काहीही झालेलं नाही. कॉन्सर्ट झाल्यावर मी स्टेजवरून खाली उतरत होतो. आजकाल सेल्फी आणि फोटोग्राफरचे जे प्रकार सुरू आहेत त्यात कोणीही समजून घेत नाही. स्वप्निल नावाच्या व्यक्तीने मला पकडलं. त्याचं नाव मला नंतर माहिती झालं. त्याने मला पकडलं, तर पहिल्यांदा मला वाचवायला हरिप्रकाश आले. त्याने हरीला धक्का दिला. त्यानंतर मला धक्का दिला. त्यामुळे मी पडलो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button