TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला पोलिसांना ‘स्मार्ट-ई- बाईक’

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या आठ महिला पोलीस अमलदारांचा सोमवारी (दि. १७) रोजी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते स्मार्ट ई-बाईक देत सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास अंकुश शिंदे पोलीस आयुक्त, काकासाहेब डोळे, पोलीस उपआयुक्त मुख्यालय, सतीश माने, सहायक पोलीस आयुक्त प्रशासन, रावसाहेब जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी, तसेच रतनदीप रे मुख्य व्यवस्थापक – दुव सॉफ्टवेअर कंपनी व संपूर्ण टीम आदी उपस्थित होते.
निगडी पोलीस ठाण्यातील महिला सहायक पोलीस फौजदार श्रीमती एम.आर. गायकवाड यांनी उत्कृष्ठ तपास व एन.डी.पी.एस अॅक्ट अंतर्गत १,४०,५६६ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन उत्कृष्ठ कामगिरी केली. भोसरी वाहतुक विभागातील महिला सहायक पोलीस फौजदार श्रीमती. सुवर्णा थेउरकर यांनी उत्कृष्ठ वाहतुक नियोजन व नियमन करुन उल्लेखनिय कामगिरी केली आहे. भोसरी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार श्रीमती ए.पी. बोरकर यांनी कोव्हीड १९ च्या कालावधीत जीवाची पर्वा न करता उल्लेखनिय कामगिरी केली आहे. वाकड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार श्रीमती तनुजा चौधरी यांनी सी. सी. टी. एन. एस. या कार्यप्रणालीवर सर्व गुन्ह्यांची माहिती वेळेत अद्ययावत करून उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार श्रीमती शालिनी वचकल यांनी जनतेशी सौहार्दपुर्ण जनसंवाद आणि मिसींग व्यक्ती तसेच महिला विषयक तक्रारींचे निरसन करुन उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. मुख्यालयातील महिला पोलीस हवालदार श्रीमती. सुरेखा देशमुख यांनी कोव्हीड १९ च्या कालावधीत जीवाची पर्वा न करता उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे. देहुरोड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस नाईक श्रीमती कविता घोडगे यांनी सन २०२२ मधील जगत्गुरु श्री. संत तुकाराम महाराज पालखी सोहळयामध्ये गर्दीचा फायदा घेवून पाकीट चोरी करणारे व चैन चोरी करणारे आरोपी निष्पन्न करुन उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. दिघी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस नाईक श्रीमती. कांचन पंडीत यांनी सन २०२२ मधील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी बंदोबस्तचे उत्कृष्ठ नियोजन तसेच पासपोर्ट व चारित्र्य पडताळणी प्रकरणे संपुर्ण निर्गती करुन उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.
उल्लेखनिय कामगिरीची दखल घेत द्रुव व टाईम्स ग्रुपने या महिला पोलीसांचा सन्मान केला. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या सर्व महिला पोलीस अंमलदारांनी समाजामध्ये अधिक उत्कृष्ठ कर्तव्य बजावून पोलीस दलाचे नाव उज्वल करावे, असे गौरवोद्गार करत मार्गदर्शन करून पुढील कर्तव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button