breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

‘विराट, गंभीर व नवीनचे IPL मधून निलंबण करा’; सुनील गावस्कर यांची मागणी

IPL2023 : आयपीएलमध्ये झालेल्या नवीन उल हक-कोहली, गंभीर-कोहली वादाबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. बीसीसीआयने आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कोहली-गंभीरवर सामना शुल्काच्या १०० टक्के तर नवीन उल हक वर ५० टक्के रकमेचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, या वादात माजी क्रिकेटर व समालोचक सुनील गावस्कर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर म्हणाले, कोहली-गंभीर वादाचे मी व्हिडिओ पाहिले. या गोष्टी कधीच चांगल्या वाटत नाहीत. विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून १७ कोटी रुपये मिळतात मग १०० टक्के मॅच फी नुसार १ कोटी रुपये दंड आकारणार तर मग हा दंड कठोर आहे का? गंभीर-कोहली यांनी या गोष्टीची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री केली पाहिजे.

आम्ही खेळायचो त्या काळात सुद्धा वाद होते, पण आता दिसणारा हा आक्रमकपणा नव्हता. आलीकडे प्रत्येक गोष्ट टीव्हीवर असल्याने प्रत्येक गोष्ट अतितीव्र स्वरूपात समोर येते. गौतम गंभीरच्या मॅच फीसबाबत मला माहिती नाही. पण अशा घटनांमध्ये खेळाडूंना काही सामन्यांसाठी निलंबित करणे हाही एक मार्ग असू शकतो. यासाठी कठोर कारवाई व्हावी, असं सुनिल देशपांडे म्हणाले.

१० वर्षापूर्वी जेव्हा हरभजन व श्रीसंतच्या बाबत असा वाद झाला होता तेव्हा त्यांना दोन सामने खेळता आले नव्हते. आपण असे काहीतरी पाऊल उचलले पाहिजे जेणेकरून अशा गोष्टी पुन्हा घडणार नाही, असंही सुनील गावस्कर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button