breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

दक्षिण मुंबईतील नेपियन्सी रोडवरील 6 मजली इमारतीला भीषण आग

दक्षिण मुंबईतील नेपियन्सी रोडवरील अॅटलास या सहा मजली इमारतीला आज पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत इमारतीच्या तीन मजल्यांवरील फ्लॅटचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. आग नियंत्रणात आणण्यात आली असून आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं अग्निशमन दलानं स्पष्ट केलं.

आज पहाटे ४ वाजून ४१ मिनिटांनी इमारतीच्या सहाव्या मजल्यावर अचानक आग लागली. फ्लॅट क्रमांक ६१मधील इलेक्ट्रिक्स वायर आणि फर्निचरने भराभर पेट घेतल्याने दुसऱ्या मजल्यावर आगीचे तांडव झाले होते. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत आगीची झळ पोहोचली. दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये अग्नितांडव निर्माण झाल्याने साखर झोपेत असणारे फ्लॅटमधील रहिवाशी खडबडून जागे झाले आणि त्यांची एकच धावपळ उडाली. सर्वांनी अंगावरील कपड्यानिशी जीवमुठीत घेऊन इमारतीच्याबाहेर धाव घेतली. यावेळी वयोवृद्धांना इमारतीच्या खाली आणताना येथील रहिवाश्यांची दमछाक झाली.

आगीचे चटके आणि धुराळे लोळ यामुळे येथील रहिवाशांना इमारतीबाहेर पडण्याचा मार्ग लवकर सापडत नव्हता. अनेकांनी किंकाळ्या फोडल्याने अनेकांचा थरकाप उडाला होता. आग प्रचंड भयानक होती. आगीमुळे इमारतीच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील अनेक फ्लॅट जळून खाक झाले आहेत. मात्र यात कोणतीही जिवित हानी झाली नाही…न

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button