breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

सिलिका सायंटिफिक कंपनीला भीषण आग; ८ ते ९ सिलेंडरचे स्फोट

ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात एका कंपनीला भीषण आग लागली. या आगीने रुद्ररुप धारण केल्याने कंपनीच्या आत असलेल्या काही सिलेंडरचा स्फोट झाला. या आगीमुळे आणि सिलिंडरच्या स्फोटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अशर आयटी पार्क शेजारी असलेल्या अंबिका नगर, प्लॉट नंबर ए – २०२ येथील सिलिका सायंटिफिक या कंपनीला शनिवारी रात्री साडे १० वाजण्याच्या सुमारास आग अचानक आग लागली. या कंपनीत प्रयोगशाळेतील सामान तयार केले जाते. या आगीने हळूहळू रौद्ररूप धारण केले. या कंपनीत एलपीजी गॅसचे सिलेंडरचा साठा असल्यामुळे जवळपास ८ ते ९ सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे आजूबाजूचा परिसर दणाणून गेला होता.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, महावितरण कर्मचारी, वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे पोलिस दल, ठाणे महानगर पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. घटना स्थळी अग्निशमन दलाचे ६ ते ७ अग्निबंब, २ फायर वाहन, १ रेस्क्यू वाहन, २ पाण्याचे टँकरसह १ रुग्णवाहिका पोहचून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे. सध्या अग्निशमन दलाकडून या कंपनीच्या कुलिंगचे काम सुरू आहे. सावधानता बाळगण्याची महावितरण कडून परिसरातील विद्युत पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता. मात्र कंपनीत लागलेली भीषण आग आणि सिलेंडरचा ब्लास्ट मुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.

  • कोणतीही जीवितहानी नाही

    या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसून कंपनी मात्र जाळून खाक झाली आहे. ही आग लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनी जवळपासच्या कंपन्यामधून कर्मचाऱ्यांना बाहेर काढत परिसर रिकामा केला. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून प्रथमदर्शनी ही आग शॉक सर्किट मुळे लागली असावी असा कयास व्यक्त केला जात आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button