breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

धक्कादायक! चुकीच्या इंजेक्शनमुळे डोळा गमावला? FIR दाखल

मुंबई : महापालिकेच्या कूपर रुग्णालयातील डॉक्टरने चुकीचे इंजेक्शन दिल्याने महिलेला दृष्टी गमवावी लागली, असा आरोप त्या महिलेच्या मुलाने केला आहे. यासंदर्भात त्याने जुहू पोलिस ठाणे येथे तक्रारअर्जही दिला आहे.

अंधेरी पूर्वेकडील सहारगाव येथे या महिलेला गेल्या काही दिवसांपासून मोतीबिंदूचा त्रास जाणवत होत होता. ही महिला मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयामध्ये भरती झाली होती. शस्त्रक्रियेदरम्यान कूपर रुग्णालयाच्या शिकाऊ डॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन आणि औषध दिल्यामुळे त्या महिलेची दृष्टी गेल्याचा आरोप महिलेच्या मुलाने केला आहे. संबंधित दोषी डॉक्टरांवर कडक कारवाई करावी अन्यथा पीडित कुटुंबियांसोबत कूपर रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन करू, असा इशाराही त्याने दिला आहे.

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी शस्त्रक्रिया ही वैद्यकीय नियमावलीचे पालन करून करण्यात आल्याचे सांगितले. रुग्णाच्या कुटुंबीयांना यासंदर्भात पूर्ण माहिती समाजवून सांगण्यात आली आहे. त्यांनी ही प्रक्रिया त्यांच्या इच्छेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांकडून विचारून घ्यावी, असाही पर्याय ठेवण्यात आल्याचे डॉ. मोहिते यांनी सांगितले. तसेच डॉक्टर शिकाऊ नव्हते. ते रुग्णालयातील डीएनबी तज्ज्ञ डॉक्टर असल्याचे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button