breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस रस्त्यावरील समतल विलगक नागरिकांना वाहतुकीस खुला

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने साई चौक येथील नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस रस्त्यावरील समतल विलगक नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्या मार्गाचे उद्घाटन महापाैर माई ढोरे यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, स्थायीच्या माजी सभापती ममताताई गायकवाड, नगरसेविका आरती चाैंधे, नगरसेवक शत्रूघ्न काटे, संदीप कस्पटे, शहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओबांसे आदी उपस्थित होते.

या ग्रेड सेपरेटरमुळे साई चौक, जगताप डेअरी येथील वाहतुक कोंडी कमी होणार आहे. वाहतुक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे हिंजवडी आयटी पार्क, पिंपळे सौदागर या मधील होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. नागरीकांना कमी वेळेत हिंजवडी आयटी पार्क येथे जाता येणार आहे. तसेच दुस-या ग्रेट सेपरेटरचा मार्गाचे काम लवकरात लवकर चालु करून तोही नागरिकांसाठी खुला करण्यात येईल. असेही महापाैर ढोरे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button