breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: वाफ घेतल्याने कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका कमी, मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या अभ्यासात दावा
मुंबई : स्टीम थेरपीमुळे कोरोनाच्या लक्षणांवर परिणाम होतो आणि कोरोनाच्या संसर्गाचा धोकाही कमी होतो असा दावा मुंबई महानगरपालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयातील डॉक्टरांच्या अभ्यासात करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे हा अहवाल इंडियन मेडिकल गॅजेटमध्ये देखील प्रसिध्द झालेला आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही काहिशी दिलासादायक बातमी दिली आहे.
आगामी काळात इतर रुग्णांना देखील स्टीम थेरपीचा लाभ मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. शरीरात कोणत्याही प्रकारचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरु नये किंवा तो कमी व्हावा यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर दिला जातो. त्यासाठी अनेक घरगुती उपायही केले जात आहेत. त्यातीलच एक उपाय म्हणजे स्टीम थेरेपी. यावर मुंबई महानगरपालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयातील डॉक्टरांनी अभ्यास केला आहे.