breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

शिवाजीराव आढळराव पाटलांचा अखेर अजित पवार गटात प्रवेश

पुणे | शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज (२६ मार्च) राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. शिरूर मतदारसंघातील मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शिवाजीरावांच्या पक्षप्रवेशावेळी त्यांच्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेच्या शिंदे गटात होते. परंतु, ही जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मिळणार असल्याने शिवाजीराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचं सांगितलं जात आहे. आढळराव यांच्या प्रवेशानंतर त्यांची उमेदवारी जाहीर होण्याची केवळ औपचारिकताच राहणार आहे.

हेही वाचा    –    IPL 2024 | ऋतुराज अन् शुभमन आमने सामने; कशी असेल प्लेइंग इलेव्हन..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यानंतर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्याव्यतिरिक्त सर्व खासदार शरद पवारांबरोबर थांबले. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटात जाण्यास नकार दिला. त्यामुळे अजित पवार गटाला या मतदारसंघात एका तगड्या उमेदवाराची आवश्यकता होती. तर दुसऱ्या बाजूला शिरूर लोकसभेची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मिळणार असल्याने शिवाजीराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचं सांगितलं जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button