TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी शिवसेना एकमेव पर्याय : खासदार कृपाल तुमाने

  •  खडकवासला मतदार संघात शिवसंपर्क अभियान

पुणे | भाजपला पुणेकरांनी महानगरपालिकेत संधी दिली मात्र, त्यांनी विकासाच्या कामांना पुरेसा न्याय दिला नाही. त्यामुळे सुज्ञ पुणेकरांनी शिवसेनेला संधी द्यावी. मुंबई महानगरपालिका प्रमाणेच पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही पालिकेत शिवसेना हा एकमेव पर्याय आहे, असे मत रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी व्यक्त केले.
शिवसंपर्क अभियानातील दुसरा टप्पा सध्या सुरू आहे. यात नऱ्हे येथील शाताक्षी हॉल येथे खडकवासला मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आयोजन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी संपर्क प्रमुख सचिन अहिर, खडकवासला विधानसभाप्रमुख नितीन वाघ, विभागप्रमुख निलेश गिरमे, महेश पोकळे, ललिता कुटे, भरत कुंभारकर, गोकुळ करांजवने, महेश विठे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सचिन अहिर म्हणाले, शिवसंपर्क अभियानाद्वारे पक्ष संघटन मजबूत करताना सक्रिय कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न करत आहोत. आगामी काळात शिवसेनेचे अनेक मंत्री पुणे आणि पिपरी चिंचवड या ठिकाणी दौरे करताना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.

खडकवासला मतदारसंघात किमान सहा जागावर विजयाची शक्यता : रमेश कोंडे, जिल्हाध्यक्ष
खडकवासला मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे. आगामी काळातील महत्त्वाच्या मंत्रांच्या दौऱ्यांमुळे सक्रिय कार्यकर्ते पक्षाची कामे मतदारांपर्यंत नक्कीच पोचावतील, यामुळे आगामी पालिका निवडणुकीत खडकवासला मतदार संघातून किमान ६ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी होवू शकतात, अशी आशा जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे यांनी व्यक्त केली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button