breaking-newsताज्या घडामोडीपुणे

महिला डॉक्‍टरने ‘कॅन्सर’ झाल्याचे सांगत रुग्णाला घातला दिड कोटीचा ‘गंडा’

पुणे |महाईन्यूज|

पुण्यातील एका महिला डॉक्‍टरने महिला रुग्णाला कॅन्सर झाल्याचे सांगत तब्बल दिड कोटीला गंडा घातला. उपचारासाठी रुग्णाने पगारातून केलेली बचत, प्रॉव्हिडंट फंट, मुदत ठेवी, पोस्टातील ठेवी, घरभाडे तसेच पतीच्या व्यवसायातून बचतीतील सर्व पैसे डॉक्‍टरला दिले.

यानंतरही डॉक्‍टरने पैशाचा तगादा लावल्यावर रुग्ण महिलेच्या पतीने डॉक्‍टरच्या उपचाराचा भांडाफोड केला. याप्रकरणी संबधीत महिला डॉक्‍टरवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

डॉ.विद्या धनंजय गोद्रस(रा.वानवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुषमा सुभाष जाधव(58,रा.वडगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीकडू 1 कोटी 47 लाख 58 हजार रुपये घेण्यात आले आहेत.

फिर्यादी सुषमा यांनी दिलेल्या तक्रारीनूसार त्या संरक्षण खात्यात ऑडिटर म्हणून कार्यरत आहे.त्यांची एका मैत्रीणीमार्फत डॉ.विद्या यांच्याशी ओळख झाली होती. दरम्यान सुषमा यांनी अर्धशिसी व गुडघेदुखीवर 2017 मध्ये डॉ.विद्या यांच्याकडे उपचार घेतले होते. तर 2019 मध्ये त्यांना अन्न नलिकेचा त्रास होत असल्याने त्यांनी डॉ.विद्या यांच्याकडे संपर्क साधला होता.

यावेळी विद्या यांनी आपण कॅनडाच्या एका आयुर्वेदीक संस्थेची फ्रेंचाईस घेतली असून त्याचा शहरातील अनेक रुग्णांना लाभ झाला असल्याचे सांगितले. सुषमा यांना व्हॉटसअपवर नाभिचा फोटो पाठवायला सांगितला होता. तो फोटो कॅनडातील संस्थेकडे पाठवून रिपोर्टमध्ये लिव्हर असायटीस झाल्याचे सांगितले.

रुग्णाला अथवा कुटूंबीयांना रिपोर्ट गोपीयन असल्याने पुर्ण बरे होत पर्यंत दाखवत नसल्याचे सांगत उपचार सुरु करण्यास सांगितले. लवकर उपचार सुरु न केल्यास मृत्यू होऊ शकतो अशी भितीही घातली. यामुळे घाबरलेल्या सुषमा यांनी तातडीने पैसे भरत उपचार सुरु केले. यानंतर सुषमा यांना औषधाची चिठ्ठी व रिपोर्ट न देता फक्त गोळ्या देण्यात येत होत्या.

यानंतर 2020 मध्ये पुन्हा नाभिचा फोटो पाठवायला सांगून लिव्हरच्या वरच्या भागात कॅन्सरची गाठ आल्याचे सांगितले. यासाठी सात लाख रुपये आगाऊ मागितले. मात्र सुषमा यांच्याकडील सर्व पैसे संपल्याने त्यांनी पतीकडे पैसे मागितले. पतीने पैशाबाबत विचारणा केली असता, सुषमा यांनी उपचाराबाबत माहिती दिली.

पतीने आजाराची कागदपत्रे व रिपोर्ट मागितले असता डॉ.विद्या यांनी ते दिले नाहीत. यामुळे त्यांचा संशय बळावल्याने सुषमा यांच्या पतीने एका वकिलासह डॉ.विदया यांची भेट घेतली. यावेळी डॉ.विद्या यांनी आजार बरा झाल्याशिवाय रिपोर्ट देता येत नसल्याचे सांगितले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अहिवळे करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button