breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंचा ७ पानांचा ठराव, त्यावर ३४ आमदारांच्या सह्या, शंभूराजे देसाईंची पहिली सही!

मुंबई :एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीतल्या हॉटेलमध्ये बैठक घेतली. आमदारांबरोबर चर्चा करुन ठराव पास केला. या ठरावावर ३४ आमदारांच्या सह्या आहेत. मराठी लोकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेला आपल्या तत्वांशी तडजोड करावी लागत आहे. आमचा पक्ष आणि आमच्या पक्षप्रमुखांनी गेल्या वर्षात प्रचंड वैचारिक तडजोड केली. मविआ सरकारच्या भ्रष्टाचाराबद्दल शिवसैनिकांमध्ये आणि लोकांमध्ये मोठा रोष आहे, असे शिंदेंनी पत्रात म्हटलं आहे. हे पत्र त्यांनी विधानसभा उपाध्यांना पाठवलं आहे. या पत्रावर शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे, बच्चू कडू, यामिनी जाधव, श्रीनिवास वनगा, संदीपान भुमरे, तानाजी सावंत यांच्यासह ३४ आमदारांच्या सह्या आहेत.

  • एकनाथ शिंदे यांच्या ७ पानी पत्रातील महत्त्वाचे ठळक मुद्दे
  • आमची भाजपसोबत निवडणूक पूर्व युती होती
  • आम्ही एकमताने ३१ ऑक्टोबर २०१९ साली एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड केली होती
  • अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईवरही एकनाथ शिंदे यांनी बोट ठेवलं आहे
  • मविआ सरकारच्या भ्रष्टाचाराबद्दल शिवसैनिकांमध्ये आणि लोकांमध्ये मोठा रोष
  • नवाब मलिक तुरुंगात असल्याने सरकारची प्रतिमा खराब होतीये
  • आमच्या विचार जुळत नसल्याने काँग्रेस राष्ट्रवादीकडून भरपूर त्रास सहन करावा लागला
  • सेनेच्या विचाराविरोधात काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार बनविल्याने शिवसेनेत प्रचंड असंतोष आहे
  • मराठी लोकांच्या हक्क्साठी लढणाऱ्या शिवसेनेला आपल्या तत्वांशी तडजोड करावी लागत आहे
  • आमचा पक्ष आणि आमच्या पक्षप्रमुखांनी गेल्या वर्षात प्रचंड वैचारिक तडजोड केली
  • बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्ववादी पक्ष म्हणून स्वच्छ आणि प्रामाणिक सरकार देणं अपेक्षित होतं
  • एकनाथ शिंदे यांच्या पत्रावर कोणत्या आमदारांच्या सह्या

    १. शंभूराज देसाई (गृह राज्यमंत्री) – पाटण, सातारा
    २. संजय शिरसाठ – औरंगाबाद पश्चिम
    ३. नितीन देशमुख – बाळापूर, अकोला
    ४. किशोर पाटील – पाचोरा, जळगाव
    ५. प्रकाश सुर्वे – मागाठणे, मुंबई
    ६. राजकुमार पटेल (प्रहार -अपक्ष) – मेळघाट, अमरावती
    ७. लता सोनवणे – चोपडा, जळगाव
    ८. यामिनी जाधव – भायखळा, मुंबई
    ९. सुहास कांदे – नांदगाव, नाशिक
    १०. विश्वनाथ भोईर – कल्याण पश्चिम
    ११. अनिल बाबर – खानापूर
    १२. चिमणराव पाटील – एरंडोल, जळगाव
    १३. शहाजी बापू पाटील – सांगोला,
    १४. शांताराम मोरे – भिवंडी ग्रामीण, ठाणे
    १५. श्रीनिवास वनगा – पालघर, पालघर
    १६. बालाजी किणीकर – अंबरनाथ, ठाणे
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button