breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंच्या गळाला लागला अपक्ष आमदार, मुंबईला निघालो सांगून थेट गुवाहाटीकडे रवाना

जळगाव : एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले असून त्यांच्यासोबत सेनेचे ४६ आमदार फूटल्याची चर्चा आहे. अशात राज्यातल्या अपक्ष आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. पण यातही जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील तातडीने मुंबईकडे रवाना झाले होते. पण आता ते थेट गुवाहाटीला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गळाला आणखी एक आमदार लागला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आपण मुंबईकडे जात असल्याचं सांगत थेट गुवाहाटीला निघाले आहेत. खरंतर, त्यांच्या मुलाची प्रकृती बिघडल्याने त्याला पाहण्यासाठी आमदार पाटील हे रात्रीचे मुक्ताईनगरात आले होते. मुलाची भेट घेतली त्यानंतर त्यांना मुंबईवरून फोन आल्यानंतर ते तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. पण यानंतर आता ते गुवाहाटीला जात असल्याची माहिती आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांचा जळगाव विमानतळावरील फोटो प्राप्त झाला आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी जळगाव विमानतळावर खाजगी विमान बोलावले. या विमानाने ते रवाना झाले आहेत विमानात बसणे पूर्वीचा त्यांचा फोटो हाती लागला असून नेमके ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले की गुवाहाटीकडे याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते ही गेले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जळगाव जिल्ह्यातील तीन सेनेचे आमदार यापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्यासोबत फुटले आहेत. यात पाचोराचे आमदार किशोर पाटील, पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील व चोपड्याचे आमदार लताबाई सोनवणे यांचा समावेश आहे.

एकनाथ शिंदेंसोबत गेलेला दुसरा आमदार परतला

दरम्यान, बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आमदारांना कशा पद्धतीने फसवून नेलं, याची माहिती आता हळूहळू समोर येत आहे. काल उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी आपली सुटका कशा पद्धतीने झाली, याचा थरारक प्रसंग मुख्यमंत्र्यांसमोर कथन केला. आज अकोल्याच्या बाळापूरचे आमदार नितीन पाटील यांनीही खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. मला हार्टअॅटक आल्याचा बनाव रचण्यात आला. मला रुग्णालयात नेल्यानंतर २०-२५ जणांना मला पकडून बळजबरीने इंजेक्शन टोचले गेले, असं नितीन देशमुख यांनी सांगितलं. त्यामुळे राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button