TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबईराजकारण

शिवसेना हे कुटुंब, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावी : दिपाली सय्यद

  • उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंनी एकत्र यावं
  • शिवसेना हे घर फुटू नये
  • शिवसैनिक म्हणून मत मांडण्याचा अधिकार
मुंबई : शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावी, असं म्हटलं आहे. बरेच दिवस झाले,मी माझ्या मनातली इच्छा व्यक्त करत आहे. शिवसेना हे एक घर आहे आणि त्यात आता दोन वेगवेगळे गट झाले आहेत. हे तुटलेलं घर एकत्र यावे एवढीच इच्छा आहे, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.

मी एक शिवसैनिक म्हणुन काम करते. माझी इच्छा तुटलेलं घर एकत्र यावे ही आहे, असं दिपाली सय्यद म्हणाल्या. माझ्यावर कारवाई होण्याचा संबंध येत नाही. मी आजपर्यंत मध्यस्थीची भूमिका घेतली आहे. मोठे नेते आहेत ते एकत्र येतील किंवा वेगळे होऊ शकतात. छोट्या कार्यकर्त्यांपासून आमदारांपर्यंत त्यांच्या मनातील इच्छा मांडत आहेत. दोन्ही गटांनी एकत्र येण्यात हित असल्याचं दिपाली सय्यद म्हणाल्या. दीपक केसरकर आणि शहाजीबापू पाटील यांनी एकत्र येण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. सर्व आमदारांच्या मनात हीच भावना असल्याचं दिपाली सय्यद म्हणाल्या.

उध्दव ठाकरे कुटुंब प्रमुख
कुटुंब प्रमुख म्हणून उध्दव ठाकरे काम करत आहेत. त्यांनी मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचं म्हटलं आहे. आदित्य ठाकरे देखील तुम्ही सर्वजण या असं म्हणत आहेत. मानापमनाच्या गोष्टी राहिलेल्या नाहीत. मात्र, कुठेतरी गोष्ट अडली आहे ती तोडण्याचं काम मी करत आहे, त्यात मला यश येईल, असं दिपाली सय्यद म्हणाल्या.

तुटलेल घर एकत्र यावे
मी हे शिवसैनिकांच्या भल्यासाठी केलं आहे. शिवसेना हे माझं कुटुंब तुटू नये, असं मला वाटत आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मला जे वाटले ते मी मांडलं आहे. प्रत्येकाच्या मनात इगो मानअपमान आहे. दुरावा दूर व्हावा, अशी भूमिका दिपाली सय्यद यांनी म्हटलं.

तुटलेल घर एकत्र यावे असं कार्यकर्ता म्हणून मला वाटते. संजय राऊत हे मोठे आहेत त्यांना बलण्याचा अधिकार आहे. मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. संजय राऊत यांनी शांततेचा पवित्रा घ्यावा आणि मध्यस्थी घडवून आणावी, अशी आशा दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button