breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शिवसेना सहाव्या जागेवर पराभूत, सेनेची शोभा झाली, मनसेने एकच ट्विट केलं पण जखमेवर मीठ चोळणारं!

मुंबई: राज्यसभेच्या सहा जागांसाठीचे सर्व निकाल हाती आले आहेत. यामध्ये सर्वात चुरशीची समजली जाणारी भाजप धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यामध्ये धनंजय महाडिकांना मोठी विजय प्राप्त झाला आहे. त्यामुळे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी महाविकास आघाडीवर भारी पडल्याचं चित्र आहे. त्यावरुन आता मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. ‘शिवसेना ही महाविकास आघाडीतील “ढ”टीम आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल’, असं म्हणत त्यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.

फडणवीसांची खेळी यशस्वी, महाडिक विजयी

शिवसेनेला त्यांच्या गणितांवर पूर्ण विश्वास होता, उमेदवार निवडणूक आणण्यासाठी त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट, अपक्षांची जुळवाजुळव, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मतांची जोड अशी कुठलीही कमी ठेवली नाही. मात्र, त्यावर फडणवीसांची खेळी मास्टर स्ट्रोक ठरली आणि धनंजय महाडिक हे ८ मतांनी विजयी झाले.

संदीप देशपांडेंचं बोचरं ट्वीट

शिवसेना ही महाविकास आघाडीतील “ढ”टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि “ढ” टीम चे कप्तान तोंडावर आपटले, असं म्हणत त्यांनी शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे. त्यांनी शिवसेनेला “ढ”टीम म्हणत त्यांची खिल्ली उडवली आहे.

राज्यसभा निवडणूक निकाल

भाजपचे पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना ४८ मतं मिळाली. तर, शिवसेनेचे संजय राऊत यांना ४१, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांना ४३ तर काँग्रेसचे इमरान प्रतापगढी यांना ४४ मतं मिळाली आहेत. महाविकास आघाडी सरकारसोबत असलेल्या आमदारांपैकी काही आमदारांना फोडण्यात भाजपला यश आलं आहे. भाजपच्या १०६ मतांशिवाय त्यांना अधिकची मतं १७ मिळवण्यात यश आलं आहे. त्यामुळे, धनंजय महाडिक हे ४१ मतांवर विजयी झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button