Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

दादरमध्ये नवं शिवसेना भवन उभारणार असल्याचं जाहीर करुन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या गटात सामील झालेले आमदार सदा सरवणकर यांनी लवकरच मुंबईतील  दादरमध्ये नवं शिवसेना भवन  उभारणार असल्याचं जाहीर करुन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला सेनेतील आमदार त्यानंतर लोकसभेतील खासदार फोडल्यानंतर आता त्यांच्या गटाकडून दादरमधील शिवसेनाभवनाला पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. सदा सरवणकर यांच्या घोषणेनंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सदा सरवणकर यांच्यावर टीका केली आहे. दलबदलू नेत्यांना काय उत्तर द्यायचं, असा सवाल किशोरी पेडणेकर  यांनी केला आहे.

दादरमध्ये नवं शिवसेना भवन उभारण्यात येणार असल्याची माहिती शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांनी दिली आहे. मुंबई शहरातील नागरिकांना सहजरित्या तिथं जाता येईल, आपल्या समस्या मांडता येईल, असं त्याचं स्वरुप असेल. नवं शिवसेना भवन काही दिवसात सुरु होईल, असं सदा सरवणकर म्हणाले. मला असं वाटतं की शिवसेनेनं कामाची सुरुवात फुटपाथवरुन केली होती. मंदिराचं स्वरुप देऊन कार्यालय सुरु केली होती. नागरिकांचे प्रश्न सुटतील हे महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसतील, मुंबईचे नागरिक येतील, असं सदा सरवणकर म्हणाले.

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना शिंदे गट मुंबईच्या दादरमध्ये नव सेना भवन उभारणार असल्याबाबत विचारलं असता त्यांनी शिंदे गटाला जोरदार टोला लगावला. आम्ही काही प्रतिक्रिया देणार नाही. काय प्रतिक्रिया द्यायची, दलबदलू काँग्रेसमध्ये जातील, इकडे जातील तिकडे जातील त्यांना काय प्रतिक्रिया द्यायची. कामातून प्रतिक्रिया देऊ, असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांना लगावला आहे.

किशोरी पेडणेकर यांनी शिवसेना हा कौटुंबिक पक्ष असल्याचं सर्वांना माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी कुटुंबप्रमुख म्हणून मार्गदर्शन केलं आहे. जे राजकारण घडतंय त्याला आपण सामोरं जात आहोत. शिवसेनेच्या ९७ पैकी १३ नगरसेवक अनुपस्थित होते, बाकी सगळे उपस्थित होते. २०१७ ची प्रभागरचना कायम ठेवल्यानं आम्हाला काही फरक पडत नाही. २०१७ च्या प्रभागरचनेच्या निर्णयाविरोधात जाण्याचा निर्णय हा पक्ष प्रमुख घेतील, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button