breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

Shirur Lok Sabha Constituency: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा राहील तोच शिरुरचा खासदार! : आमदार महेश लांडगे 

भाजपा लोकसभा मतदार संघ नियोजन समितीच्या बैठकीत जबाबदाऱ्यांचे वाटप 

राजगुरुनगर : शिरूर लोकसभेला उमेदवार कोण असेल माहित नाही. त्यामुळे उमेदवार न पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा राहणारा खासदार शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून देण्याचा आमचा निश्चय आहे. आमच्या दृष्टीने व्यक्तीपेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे. माझे नाव शिरूर लोकसभा मतदारसंघातून प्रबळ उमेदवार म्हणून येत असले, तरी आमच्या पक्षाचा निर्णय अंतिम असेल. ‘कमळ’च्या चिन्हावरील खासदार शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेला, तर या मतदारसंघातले रखडलेले सर्व प्रश्न सुटतील, अशी भूमिका भाजपा आमदार महेश लांडगे यांनी मांडली.

भाजपाच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक नियोजन समितीची बैठक आज संतोषनगर भाम येथील जिल्हा कार्यालय संपन्न झाली यावेळी ते बोलत होते.लोकसभा निवडणूक नियोजन समितीची ही पहिलीच बैठक होती. या समितीमध्ये एकूण ६० लोकांचा समावेश असून निवडणुकीसाठी आवश्यक ती तयारी आणि त्याचे कामकाज वाटप यावेळी करण्यात आले.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील  यांनी आयोजित केलेल्या बैठकीसाठी आमदार महेश लांडगे, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक व प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, विधानसभा निवडणुक प्रमुख प्रदीप कंद,आशाताई बुचके,जयश्री पलांडे, विकास डोळस,जिल्हा सरचिटणीस संजय रौंधळ, ताराचंद कराळे,लोकसभा विस्तारक श्रीकृष्ण देशमुख, राम गावडे, राजेश कोरेकर,संदीप सातव,प्रवीण काळभोर ,सुदर्शन चौधरी, राजेश काळे ,प्रमोद बाणखेले, विनोद भालेराव, संयोगिता पलांडे, आशिष माळवदकर ,जयप्रकाश सातव ,प्रदीप सातव, भगवान घोलप, शक्तीसिंग कल्याणी, रवींद्र दुर्गे , प्रीतम शिंदे ,प्रमोद कड रवी गायकवाड ,जयसिंग एरंडे, केशव पाचरणे ,गौरव झुरंगे, विजय जाचक, सचिन मचाले, अशोक गभाले अविनाश मुंडे ,राहुल गवारे,यांच्यासह  यासह जुन्नर,आंबेगाव,खेड, शिरूर, हवेली,हडपसर आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख ६० पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी ६० पदाधिकाऱ्यांना निवडणूक नियोजनासाठी विविध जबाबदाऱ्यांचे वाटप केले. प्रत्येकाने आपल्याला दिलेल्या जबाबदारीच्या दृष्टीने तयारी करावी केंद्रातील नेते लवकरच या नियोजन समिती बरोबर बैठक घेऊन लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहे अशी माहिती शरद बुट्टे पाटील यांनी यावेळी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button