breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

अयोध्येतून शिंदेंची ठाकरेंवर टीका… म्हणाले, राणा दाम्पत्याला तुरुंगात टाकणारे रावण होते

आयोध्या ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी अयोध्येत रॅली काढण्यात आल्या. फडणवीस आणि शिंदेंच्या हस्ते महाआरती करण्यात आली. रॅली संपल्यानंतर झालेल्या सभेतून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना डीवचलं, राणा दाम्पत्याला तुरुंगात टाकणारे रावण होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले, अयोध्येत भगवेमय वातावरण झाले आहे. प्रभू रामजींचा धनुष्यबाण घेऊन आम्ही आलो आहोत. मुख्यमंत्री बनल्यानंतर मी पहिल्यांदा अयोध्येत आलो आहोत. अयोध्येत राम मंदिर बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. नरेंद्र मोदी यांनी हे स्वप्न केले आहे. जे मंदिराविषयी विचारत होते त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. हनुमाण चालीसा पठण करणारे रवी राणा आणि खासदार नवणीत राणा यांना देशद्रोहाचा आरोप लावून तुरूंगात टाकण्याचे पाप करणारा राम होती की रावण?, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button