breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

इंडिया आघाडीतल्या मतभेदांवर शरद पवार यांचं मोठं विधान; म्हणाले..

मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातल्या विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली. मात्र इंडिया आघाडीतून एक एक नेता वेगळा होत आहे. पहिल्यांदा नितीशकुमार वेगळे झाले, यानंतर ममता बॅनर्जींनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत मतभेद निर्माण झाले असल्याची चर्चा सुरु झाली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

शरद पवार म्हणाले की, इंडिया आघाडीत काही ठिकाणी वादविवाद आहेत. मात्र ते मिटवण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. आम्ही सगळे एकत्र आहोत. मोदी सरकारच्या विरोधात लढा देण्यासाठी आम्ही एकत्र काम करतोय, असं ते म्हणाले.

हेही वाचा     –      HSC Exam | उद्यापासून बारावीची परीक्षा सुरु, पेपरला जाताना ही काळजी घ्या..

इंडिया आघाडीची अलिकडे बैठक झाली नाही. काही पक्षांची भूमिका त्या राज्यपूर्ती सीमित आहेत. काही राज्यात वादविवाद आहे, हे नाकारता येत नाही. उदाहरणार्थ पश्चिम बंगाल याठिकाणी आम्ही परिस्थितीवर चर्चा अजून झाली नाही. काँग्रेस पक्षाचे मल्लिकार्जुन खरगे हे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातील चर्चेबाबत आमच्याकडून मी असत नाही. आमच्याकडून जयंत पाटील, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि सेनेकडून संजय राऊत चर्चा करतात. निपाणी लोकसभेच्या बाबतीत आम्ही चर्चा करतोय. सुदैवाने कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे, असं शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्रातील तीन जागांबाबत महाविकास आघाडीत निर्णय झाला नाही उद्या याबाबत बैठक होणार आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याचे मला आश्चर्य वाटत नाही. आदर्श घोटाळ्याचा उल्लेख श्वेतपत्रिकेत आला होता. तेव्हाच वाटलं होतं की अशोक चव्हाण वेगळा निर्णय घेऊ शकतात. त्यानंतर जे व्हायचं ते झालं, असंही शरद पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button