breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

शरद पवार, अजित पवार उद्या पुण्यात एकाच व्यासपीठावर

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे अध्यक्ष शरद पवार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, डॉ. इंद्रजीत मोहिते, जयप्रकाश दांडेगावकर, विशाल पाटील, बी. बी. ठोंबरे, श्रीराम शेटे, नरेंद्र घुले पाटील, शिरीषकुमार नाईक, अशोक पवार, आमदार बबनराव शिंदे, अरविंद गोरे, सतेज पाटील, प्रकाश आवाडे, विश्वजीत कदम, बाळासाहेब पाटील, दिलीप देशमुख, राजेश टोपे, गणपतराव तिडके, रोहित पवार, हर्षवर्धन पाटील असे ४१ सदस्य आहेत.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या (व्हीएसआय) नियामक मंडळाची सभा रविवारी संस्थेच्या मांजरी येथील मुख्यालयात आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – उन्हाळ्यात या पिकांची लागवड करा आणि चांगले पैसे कमवा!

अजित पवार यांनी शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी विशेषतः अजित पवार यांनी एकाच कार्यक्रमात एकत्र येण्याचे टाळले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पवारांनी एकत्र येणे टाळले आहे. जगावाटपात बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांनी उमेदवार देणार, असल्याचे स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button