breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

Pune : कोयता गँगकडे दुर्लक्ष करणं पडलं महागात, वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह सात कर्मचारी निलंबित

पुणे : पुणे पोलीस दलाच्या इतिहासात प्रथमच पोलीस आयुक्तांनी एकाच वेळी सात पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तळजाई आणि सहकारनगर भागात वाहनांची तोडफोड होण्याच्या घटनांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून सहकारनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक तसेच पोलिस निरीक्षक आणि पाच कर्मचाऱ्यांना पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गुरुवारी निलंबित केले. या महिन्यात घडलेल्या वाहन तोडफोड घटनांची तक्रार गांभीर्याने न घेणे या पोलिसांना महागात पडले आहे.

सहकारनगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक मनोज शेंडगे, सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे, पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, मारुती वाघमारे, हवालदार संदीप पोटकुले, विनायक जांभळे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. कर्तव्य गांभीर्याने आणि जबाबदारीने पार पडले नसल्याने शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. साळगावकर यांची पोलीस नियंत्रण कक्षात दोन दिवसांपूर्वी बदली करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच त्यांच्या निलंबनाचे आदेश आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – DSK Kunjban : ‘डीएसके कुंजबन’ सोसायटीत आषाढी वारी उत्साहात

दरम्यान, अरण्येश्वर भागात टोळक्याने दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री दहा ते पंधरा वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली होती. गेल्या आठवड्यात तळजाई पठार परिसरात सराईत गुंड आणि साथीदारांनी २६ वाहनांची तोडफोड केली होती. टोळक्याने सहकारनगर भागात भररस्त्यात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button