breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रिपाई युवक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची निवड

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप

पिंपरी : प्रतिनिधी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या युवक आघाडीची बैठक नुकतीच पार पडली. या वेळी शहरातील विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांच्या चिंचवड येथील जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

वाचा :-सायबर हल्ल्याच्या आड पाच कोटींचा विमा लाटण्याचा डाव – जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांचा आरोप

शहरअध्यक्ष सुरेश निकाळजे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी महाप्रदेश सचिव बाळासाहेब भागवत यांच्या उपस्थितीत व त्यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ति पत्र देण्यात आले.नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये रिपाई पिंपरी चिंचवड शहर कायदेशीर सल्लागार पदी ॲंड दिपक ओव्हाळ यांची निवड करण्यात आली. प्रभाग क्रमांक २६ वाकड युवक अध्यक्षपदी स्वप्निल कसबे, कार्याध्यक्षपदी अजय घडसिंग, उपाध्यक्ष पदी सुरज वायदंडे, प्रभाग सचिव तात्या कोळेकर, खजिनदारपदी कैलास दुनघव, संघटकपदी तुषार पुसे, सहसचिवपदी पोपट कांबळे, सल्लागारपदी मयुर थोरात यांची अधिकृत निवड करण्यात आली.

या वेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांना पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button