breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

मिशन- २०२२ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा १६ ऑक्टोबरला पिंपरी-चिंचवडमध्ये मेळावा

  • राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार
  • आजी-माजी आमदारांसह आझम पानसरे यांची बैठक

 

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार आता सक्रिय झाले आहेत. येत्या १३ ऑक्टोबरला शहरातील माजी नगरसेवकांची बैठक होणार असून, दि. १६ ऑक्टोबर रोजी पक्षाचा मेळावा आयोजित केला आहे.

पिंपरी – चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांची गुरूवारी सदिच्छा भेट घेतली. यावेळी पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, जगदीश शेट्टी, मोहम्मदभाई पानसरे, श्याम वाल्हेकर, रामधर धारिया, अतुल शितोळे, गणेश शिंदे, श्रीरंग शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी येत्या १३ ऑक्टोंबर रोजी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस माजी नगरसेवक संघटनेची बैठक आणि १६ ऑक्टोंबर रोजी पक्षाचा मेळावा घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने शरद पवार आता सक्रिय झाल्याचे दिसत आहे.

भोसरीत उद्या राष्ट्रवादीची आढावा बैठक …

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उद्या शुक्रवार दि. ०१ ऑक्टोबर २०२१  रोजी ”भोसरी विधानसभा” कार्यकर्त्यांची “आढावा बैठक” शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी  खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, आमदार अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर आदी उपस्थित राहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button