ताज्या घडामोडीमुंबई

‘बेस्ट’मध्येही आता आसन आरक्षणाची सोय!

मुंबई | सकाळी किंवा सायंकाळी गर्दीच्या वेळी बेस्ट बसला असलेली गर्दी, रिक्त नसलेली आसने, बस थांब्यावर वेळेत येत नसलेल्या बस यामुळे प्रवाशाचे कामाचे नियोजन बिघडते. यातून सुटका करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने ओला, उबर या मोबाइल अ‍ॅप आधारित खासगी टॅक्सी सेवांच्या धर्तीवर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बसचा मार्ग, वेळ समजताच त्यातील आसन आरक्षित करण्याची सोय उपक्रमाकडून प्रवाशांना उपलब्ध केली जाणार आहे. यासाठी सध्याच्या ‘चलो’ मोबाइल अ‍ॅपमध्ये किंवा स्वतंत्र अ‍ॅपद्वारे सेवा मिळेल. येत्या तीन महिन्यात ही सुविधा प्रवाशांच्या सेवेत येईल, अशी माहिती उपक्रमाकडून देण्यात आली.

टॅक्सी, रिक्षा वेळेत उपलब्ध न होणे, चालकांकडून भाडे नाकारणे, जादा भाडे घेणे इत्यादींमुळे प्रवाशांना मनस्ताप होत असतो. हेच हेरून ओला, उबर मोबाइल अ‍ॅप आधारित खासगी वातानुकूलित टॅक्सी सेवा सुरू झाली. बेस्ट उपक्रमाकडूनही आता प्रवासी संख्या व उत्पन्नासाठी ओला, उबरच्या धर्तीवर काही सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भविष्यात प्रवाशांना बेस्ट बसमधील आसनही आरक्षित करता येणार आहे. त्यासाठी बेस्टच्या सध्याच्या अ‍ॅपमध्ये बदल करून किंवा स्वतंत्र अ‍ॅपद्वारे आसन आरक्षित करण्याची सुविधा दिली जाईल. त्यात प्रवाशांना बसचा मार्ग, वेळ, त्या मार्गावर आणखी किती बससेवा असतील, याची माहिती मिळू शकेल.

खासगी टॅक्सी कंपन्यांप्रमाणेच बेस्टकडून सेवा देण्यात येणार असून यामध्ये प्रवाशांना बसचे आसन आरक्षित करता येईल. या सेवांमध्ये फक्त वातानुकूलित बस चालवण्यात येतील. त्याचे नियोजन सुरू असून येत्या तीन महिन्यात ती सेवा उपलब्ध होणार आहे. एका मोबाइल अ‍ॅपद्वारे नवीन सेवा प्रवाशांना दिली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा बरासचा वेळही वाचेल व प्रवासही सुकर होईल, असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले. या बसमधून आसन आरक्षित करणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button