TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मोसमी पाऊस बदलाच्या दिशेने

मुंबई : हवामान बदलाच्या परिणामामुळे गेल्या चार ते पाच वर्षांत पावसाचे स्वरूप हळूहळू बदलत आहे. यंदा तर, त्याचे नवीन रूप दिसून आले. मोसमी पाऊस प्रणाली तिच्या नेहमीच्या मार्गाचा अवलंब करत नसून त्याचा बदललेला परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांतही त्याचे रूप हे या वर्षीप्रमाणे असेल, अशी शक्यता आहे, असे ‘क्लायमेट ट्रेंड’च्या अहवालात स्पष्ट केले आहे.

देशात यंदा सरासरीपेक्षा १०६ टक्के जास्त पावसाची नोंद झाली. प्रशांत महासागरातील ‘ला निना’ परिस्थितीमुळे अतिरिक्त पावसाची नोंद झाली. बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीने देशाच्या विविध भागात जुलै महिन्यापासून चांगला पाऊस पडला. देशात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरी ८७० मिमी पावसाच्या तुलनेत ९२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, देशातील १८७ जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट नोंदवली असून यापैकी सात जिल्ह्यांमध्ये मोठी पावसाची तूट आहे. मध्य भारतात सरासरीपेक्षा २२ टक्के पावसाची नोंद झाली आहे, तर पूर्व आणि ईशान्य भारतात १८ टक्क्यांची तूट आहे.

हवामानाच्या बदलामुळे मोसमी पावसाचे स्वरूप बदलत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांतही मोसमी पावसाचा कल बदललेला दिसून येणार आहे, अशी माहिती ‘क्लायमेट चेंज’चे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी दिली.

काही भागांमध्ये अधिक पावसाची नोंद..

यंदा जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मोसमी पावसाने ‘इंडो-गंगे’च्या मैदानी प्रदेशाचा पारंपरिक मार्गाऐवजी मध्य भारतातून प्रवास केला. परिणामी, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये या हंगामात जास्त पावसाची नोंद होत आहे. यापैकी बहुतेक प्रदेशांत मुसळधार पाऊस पडत नाही, असे ‘क्लायमेट ट्रेंड’च्या अहवालात स्पष्ट केले आहे.

संशोधनाची आवश्यकता..

एका भागात पूर आणि इतर भागांमध्ये पावसाची कमतरता दिसून येत आहे. पावसाचे बदललेले स्वरूप समजणे आणि मोसमी पावसाचे उशिराने येण्याचे कारणे समजून घेणे खूप कठीण आहे. यासाठी बरेच संशोधन करणे आवश्यक आहे, अशी माहिती ‘सेंटर फॉर क्लायमेट चेंज रिसर्च’चे कार्यकारी संचालक डॉ. आर कृष्णन यांनी दिली.

*जून महिन्यात देशात सामान्यत: १६५.३ मिमी पावसाची नोंद होते. मात्र, यंदा १५२.३ मिमी पावसाची नोंद झाली. कमकुवत सुरुवातीमुळे आणि त्यानंतर मंदावलेल्या प्रगतीमुळे जूनच्या सुरुवातीच्या महिन्यात देशात ८ टक्के पावसाची तूट होती.

*जुलै या महिन्यात देशात सामान्यत: २८०.५ मिमी पावसाची नोंद होते. तर, यंदाच्या वर्षी ३२७.७ मिमी पावसाची नोंद झाली. मोसमी पावसाने जुलैमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. देशात सरासरीपेक्षा १७ टक्के अधिक पाऊस झाला.

*ऑगस्ट महिन्यात देशात सामान्यत: २५४.९ मिमी पावसाची नोंद होते. तर, यंदा २६३.७ मिमी पावसाची नोंद झाली. सरासरीपेक्षा फक्त ३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली.

*सप्टेंबरमध्ये देशात सामान्यत: १६७.९ मिमी पावसाची नोंद होते. तर, यंदा १८१.३ मिमी पावसाची नोंद झाली. सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक पावसाची नोंद झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button