breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

राज्यातील शाळा सुरू होणार १५ जूनला, तर विदर्भातील शाळा ३० जूनला भरणार

राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या तारखांविषयी अनेक संभ्रम निर्माण झाले होते. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात होत्या, पण आता स्वतः शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना सुट्ट्यांचे नियोजन करता यावे यासाठी राज्य मंडळाच्या शाळा सुरू होण्याची तारीख सांगितली आहे.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य मंडळाच्या शाळा १५ जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच राज्याच्या तापमानाचा वाढता पारा पाहता, विदर्भातील उन्हाची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा ३० जून रोजी सुरू होतील, असेही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे.

मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, शाळेत दाखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत यावर्षी देखील मुलाच्या शाळेतील पहिल्या पावलाचे स्वागत केले जाणार आहे. शाळापूर्व तयारीचा पहिला मेळावा २६ एप्रिल पासून आणि दुसरा मेळावा जून महिन्यात घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात यावर्षीपासून शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश तसेच वह्या, बूट आणि सॉक्स हे शासनातर्फे दिले जाणार आहेत. पुस्तकांमध्ये प्रत्येक धड्यानंतर टिपण (नोटस्) काढण्यासाठी आता एक पान कोरे ठेवले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी होईल, असा विश्वास मंत्री केसरकर यांनी व्यक्त केला आहे.

येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये ‘आजी आजोबा दिवस‘ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील अघोषित व घोषित विनाअनुदानित शाळांना अनुदान उपलब्ध करून देण्याचा तसेच त्रुटीपूर्ततेनंतर अनुदानासाठी पात्र ठरलेल्या अघोषित शाळांच्या नैसर्गिक तुकड्यांना सरसकट २० टक्के अनुदानासाठी पात्र घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आला असल्याचं, दीपक केसरकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button