breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेश

भारताने लोकसंख्येत चीनला टाकलं मागे!

World Population Report : भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. भारताने लोकसंख्येच्या बाबतीत अव्वल असणाऱ्या चीनला मागे टाकलं आहे.

युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या अहवालानुसार, भारत-चीनमध्ये जगाच्या एकूण लोकसंख्येपेक्षा एक तृतीयांश लोक आहेत. या अहवालानुसार भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी झाली असून चीनची १४२.५७ कोटी नोंदवण्यात आली आहे. तर जगाची लोकसंख्या आता 8 अब्जांच्या पुढे गेली आहे. भारताचा प्रजनन दर सरासरी २.० नोंदवण्यात आला आहे, तर सरासरी आर्युमान पुरुषांसाठी ७१ वय तर महिलांसाठी ७४ वय आहे.

अहवालानुसार भारतातील लोकसंख्येत तरूणांचं प्रमाण सर्वाधिक आहे. देशातील २५ टक्के लोकसंख्या ही ० ते १४ वयोगटातील आहे. तर १८ टक्के लोकसंख्या ही १० ते १९ वयोगटातील आहे. १० ते २४ वयोगटातील आकडेवारी ही २६ टक्के आहे. म्हणजे देशात तरूण वर्गाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे अगदी या उलट चीनमध्ये परिस्थिती आहे. चीनमध्ये एक मोठा वर्ग वृद्ध आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button