breaking-newsक्रिडा

…तर महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल स्पर्धा भरवणं शक्य – BCCI अध्यक्ष सौरव गांगुली

बीसीसीआयने आयोजित केलेल्या आयपीएल स्पर्धेने गेल्या काही वर्षांमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या देशांमधले अनेक खेळाडू या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक असतात व मध्यंतरी महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल स्पर्धा भरवावी अशी मागणी चाहत्यांकडून केली होती. २०१९ च्या हंगामात बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंसाठी ३ प्रदर्शनीय सामन्यांचं आयोजन केलं होतं. मात्र यानंतर हा विषय पुन्हा मागे पडला. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने महिला क्रिकेट आयपीएलबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

“काही गोष्टी आपण सर्वांनी नीट समजावून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला महिलांसाठी आयपीएल स्पर्धा भरवायची असेल, तर तेवढे खेळाडू लागतात. येत्या ४ वर्षांच्या काळात हे शक्य होईल, आणि तेव्हाच महिलांसाठी ७ संघ सहभागी होतील, अशी आयपीएल स्पर्धा भरवता येईल. स्थानिक राज्य संस्थांनी आपल्या अंतर्गत खेळणाऱ्याी महिला क्रिकेटपटूंना अजुन प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ज्यावेळी महिला खेळाडूंची संख्या १५०-१६० च्या घरात पोहचले त्यावेळी ही स्पर्धा भरवणं नक्कीच शक्य होईल.” एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गांगुली बोलत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button