breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

चीनमध्ये शाळा-कॉलेज, सिनेमागृह खुले, बीजिंगमध्ये परदेशींच्या थेट प्रवेशावर बंदी

कोरोनाच्या संसर्गामुळे भलेही चीनवर जगभरातून आरोप केले जात असतील. परंतु काेरोनाच्या काळात केवळ चीनमध्येच आर्थिक व्यवहार आणि सामान्य जनजीवन सुरळीत झाले आहे. उर्वरित जगात काही ठिकाणी मजुरांचा तुटवडा तर कुठे जागतिक मागणीत घट आहे. परंतु चीनमधील कारखाने पूर्ण क्षमतेने कामाला लागले आहेत. जगभरात वर्क फ्रॉम होम आता न्यू नॉर्मल झाले असताना चीनमध्ये मात्र कार्यालयांत संपूर्ण कर्मचारी वर्ग नव्या जोमाने व्यग्र झाल्याचे दिसते. सार्वजनिक वाहन व्यवस्था सुरू झाली. शाळा-महाविद्यालये उघडली. चीनची राजधानी बीजिंगमधील सद्य:स्थिती व त्यामागील कारणांचा हा ग्राउंड रिपोर्ट….

शाळा | बालवाडी- महाविद्यालयापर्यंत खुले
संपूर्ण चीनमध्ये केजीपासून कॉलेजपर्यंत सर्व काही सुरू झाले आहे. त्याला चांगला प्रतिसाद आहे. केवळ परदेशी विद्यार्थी असलेल्या उच्च शिक्षण संस्था अद्याप सुरू होणे बाकी आहे.

कार्यालय | सॅनिटायझेशनसाठी यूव्ही गेट कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझेशनसाठी यूव्ही किरणांची सुविधा असलेले गेट लावले आहेत. प्रकृती बिघडल्यास कर्मचाऱ्यांना तत्काळ सुटी दिली जाते.

बीजिंगचा ठोक बाजार दोन महिन्यांनंतर आता सुरू झाला आहे. महामारीमध्ये आधी ३० ते ३५ टक्के लोक मास्क घालत होते. आता ८० ते ८५ टक्के लोक मास्क घालतात. रोकड व्यवहार जवळपास संपुष्टात आला

सार्वजनिक परिवहन, आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाली आहेत. ३६ युरोपीय, १३ आशियाई देशातील नागरिक येऊ शकतात. दर पाच दिवसांपूर्वी जारी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य मानले जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button