साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक
नाशिक – नाशिक येथे सुरु असलेल्या साहित्य संमेलनात आज ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. संमेलनाच्या मुख्य स्टेजच्या मागच्या बाजूला ही घटना घडली. कुबेर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल पुस्तकात चुकीची आणि अवमानकारक माहिती लिहिली आहे. त्यामुळे त्यांचा निषेध करण्यासाठी शाईफेक करण्यात आली, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे नितीन रोटे पाटील यांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या दोन कार्यकत्यार्र्ंना ताब्यात घेतले आहे.
साहित्य संमेलनाच्या आज शेवटच्या दिवशी ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर परिसंवाद या कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकत्यार्र्ंनी त्यांना घेरुन त्यांच्यावर शाई फेकली. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकत्यार्र्ंनी गिरीश कुबेर यांचा धिक्कार असो, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो, अशा घोषणाही दिल्या. काही वेळ येथे तणावाचे वाताण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या दोन कार्यकत्यार्र्ंना ताब्यात घेतले. याबाबत बोलताना संभाजी ब्रिगेडचे नेते नितीन रोटे पाटील म्हणाले की, गिरीश कुबेर यांनी संभाजी महाराजांवर ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले आहे. त्याचा वचपा काढण्यासाठी आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो. आज पट्ट्यात येतील, उद्या पट्ट्यात येतील, ते भेटलेच संभाजी ब्रिगेडच्या वाघांना. शेवटी वचपा काढलाच, असे पाटील म्हणाले. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकाराबाबत निषेध व्यक्त केला आहे. मराठी भाषेचा उत्सव सुरु असताना मराठी पत्रकारावर अशा प्रकारचा हल्ला करणे योग्य नाही, याचा मी निषेध करतो, असे राऊत म्हणाले. तर विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांनीही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे हे निंदनिय असल्याचे म्हटले आहे.