breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गायन, वादन क्षेत्रात रिजायाशिवाय यश नाही : डॉ. नंदकिशोर कपोते

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

निगडी येथील नंदकिशोर कल्चरल अ‍ॅकॅडमी येथे प्रभात कल्चरल फाऊंडेशन व नंदकिशोर कल्चरल अ‍ॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “15 व्या वार्षिक संगीत महोत्सव 2019” निमित्त प्रभात कल्चरल फाऊंडेशन युवा पुरस्कार वर्षा सत्यनारायण (गायन) पै. बाबूमिया बँडवाले पुरस्कार मफीज ईनामदार, शेवगाव (नाट्य व अभिनय) विठ्ठल मोरे (डॉ. बाबा आढाव यांची कामगार चळवळीवर मिळविलेली पी.एच.डी.) मिळविल्या प्रित्यर्थ सर्वांना स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ डॉ. नंदकिशोर कपोते यांच्याहस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रंगमंचावर अध्यक्ष लतिफ सय्यद समवेत गायक व वादक संतोष साळवे, मंगेश भोंडवे, तुषार केळकर, चंद्रशेखर बावणे, मुकूंद बाद्रायणी, संतोष येरंडे आदी उपस्थित होते.
यावेळी गायिका वर्षा सत्यनारायण यांनी दरबारी कानडामधील बंदीश नाट्यगीत, भजन गाऊन उपस्थितांची मने जिंकली. मुकूंद बाद्रायणी यांचे शास्त्रीय गायन झाले.
डॉ. नंदकिशोर कपोते पुढे म्हणाले, येथील उपस्थित पालकांच्या शहरातील ज्या शाळा, महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना गायन, वादन क्षेत्रात विशेष रुची आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून योग्य ते मार्गदर्शन करावे, संगीत क्षेत्रातील गायन व वादनात रियाजाशिवाय काहीच साध्य करता येत नाही. योग्य प्रशिक्षण व नित्यरोज सरावामधूनच उत्तम कलाकार घडतो. त्यासाठी कष्टाची तयारी हवी, प्रभात कल्चरल फाऊंडेशन गेली पंधरा वर्षे संगीत क्षेत्रात कार्यरत असणार्‍यांना कलाकरांना पुरस्कार देवून त्यांना जे प्रोत्साहन देतात ही कौतुकास्पद बाब आहे. पुरस्कारामुळे कलाकारांची कोणीतरी दखल घेतात ही जाणीव व आनंदही होतो. पुरस्काराने जबाबदारीही वाढून रसिकांना चांगले गीत, संगीताची मेजवानी मिळते स्वतःही त्याचा आस्वाद घेतात.
कार्यक्रमाची प्रस्तावनात प्रभात कल्चरल फाऊंडेशनचे अध्यक्ष शास्त्रीय गायक लतिफ सय्यद म्हणाले, या शहराची औद्योगिक नगरीसारखी कलाकरांची नगरी ही ओळख निर्माण व्हावी. या उदात्त हेतूनेच अनेकांच्या मदतीमधून असे उपक्रम राबवित आहोत. आजच्या कार्यक्रमासाठी विद्यमान वकील अ‍ॅड. शिवाजी जांभूळकर, अजिज सय्यद, उद्योजक प्रविण व अभय पोकरणा, जगदीश शेट्टी यांनी विशेष सहकार्य केले. अशाच्या प्रेम व मदतीमुळेच आजचा कार्यक्रम संपन्न होत आहे. अशा शब्दांत कौतुक केले.
सूत्रसंचालन खजिनदार विठ्ठल मोरे यांनी तर आभार शगुप्ता सय्यद यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास भालेकर, शाहरुख सय्यद, प्रकाश तेंडूलकर, गुलामअली भालदार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button