ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘शिक्षक आपल्या दारी’चा अनोखा उपक्रम मावळात सुरु,संतोष खांडगे यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

पिंपरी चिंचवड | कोरोनाच्या साथीमुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्याला ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय काढण्यात आला. मात्र, मावळ तालुक्यातील काही दुर्गम भागात ऑनलाईन शिक्षणाची साधने अद्याप पोहोचलेली नाहीत. अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ऑनलाईन शिक्षण घेण्यासही अडथळे येत आहेत. ही अडचण जाणून नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी ‘शिक्षक आपल्या दारी’ हा उपक्रम पवनानगर येथे पवना शिक्षण संकुलात सुरु केला. या अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली असून शाळेचे शिक्षक थेट गावात, वस्त्यांवर जाऊन मोकळ्या वातावरणात कोरोनाचे नियम पाळून मुलांना विद्यादान देत आहेत. संतोष खांडगे यांनी सुरु केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. सर्वच विद्यार्थी या ऑनलाईन प्रवाहात नसल्याने नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या पवनानगर येथील पवना शिक्षण संकुलाच्या वतीने एक नाविन्यपूर्ण उपक्रम ‘शिक्षक आपल्या दारी ‘ राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत पवनमावळातील धालेवाडी, मालेवाडी सारख्या दुर्गम भागात शिक्षक विद्यार्थ्यांच्या गावात जाऊन ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.

कोरोनामुळे विद्यार्थी व शिक्षक भेटू शकत नव्हते गेल्या एक वर्षापासून ऑनलाईन शाळाच चालू होती परंतु आता ऑनलाईन तासाचा देखील मुलांना कटाळा येऊ लागला आहे. मावळमधील पवनानगर हा भाग ग्रामीण भाग असल्याने तेथे नेटवर्कची समस्या वारंवार उद्धभवत असते, त्यातच काही पालकांची बेताची परिस्थिती आहे ज्यांना मुलांनी ऑनलाईन शिक्षण देणे न परवडण्याजोगे आहे.अनेक मुलं मालेवाडी,धालेवाडी अशा डोंगराच्या पायथ्याशी राहत असल्याने अनेक मुलांचा शाळेशी संपर्क तुटला होता. दरम्यान, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांना ही बाबत प्रकर्षाने लक्षात आली. यावर मार्ग म्हणजे काय असा विचार चालू असताना विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाही परंतु शिक्षक त्यांच्या घरी जाऊन त्यांना शिकवू शकतो ही संकल्पना नव्याने पुढे आली.

या संकल्पनेतून व पवना विद्यालयातील शिक्षकांच्या सहकार्याने इयत्ता 5 वी ते 8 वी शिकविणारे शिक्षक शाळेच्या परिसरातील गावात तसेच दुर्गम असणाऱ्या वाड्या वस्त्यांवर जाऊन मंदिर व मोकळ्या जागेत कोरानाचे नियम पाळत विद्यार्थांना एकत्र करत ‘शिक्षक आपल्या दारी’ या स्तुत्य उपक्रमाची सुरवात करून विद्यार्थांना शिक्षणाचे धडे देण्यास सुरवात केली आहे.त्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे शिक्षक आपल्या गावात आपल्याला शिकवण्यासाठी आले आहेत हे पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत होता, तसेच संस्थेची व शिक्षकांची आपल्या विद्यार्थ्यांंनी शिक्षणापासून वंचित राहु नये यासाठी करत असलेली धडपड पाहून पालक देखील या उपक्रमाचे कौतुक करत आहेत.

संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पवना शिक्षण संकुलाच्या प्राचार्या अंजली दौंडे व पर्यवेक्षिका निला केसकर, शिक्षक सुनिल बोरुडे,राजकुमार वरघडे,भारत काळे,गणेश ठोंबरे,महादेव ढाकणे,बापुसाहेब पवार,संजय हुलावळे, रोशनी मराडे,वैशाली वराडे,मंजुषा गुर्जर,छाया कर्डिले,सुवर्णा काळडोके, पल्लवी दुश्मन,सुनिता कळमकर,ज्योती कोंढभर,अमोल जाधव,सारिका केंद्रे, गणेश साठे, चैत्राली ठाकर,कांचन तिकोणे, संतोष ठाकर,सुप्रिया साठे,पुनम दुश्मन,स्वाती आडिवळे व कर्मचारी अशा साऱ्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे हा उपक्रम यशस्वी होण्यास मदत होत आहे.

दरम्यान, या उपक्रमाविषयी बोलताना संस्थेचे सचिव संतोष खांडगे म्हणाले, ‘कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहे त्यामुळे त्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यासाठी हा उपक्रम संस्थेने हाती घेतला आहे ग्रामीण भागातील पवना शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना वाड्यावस्त्यावर जाऊन ज्ञानदानाचे काम करत आहे आणि हा प्रयोग आता संस्थेतील इतर शाळेत राबविण्यात येणार आहे.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button