breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

सांगलीत मुसळधार; कृष्णेची पाणीपातळी 23 फुटांवर

सांगली – कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे. सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सांगलीच्या कृष्णा नदीची पाणीपातळी 23 फुटांवर गेली आहे. तर जिल्ह्यात पावसाची संथदार सुरूच असल्याने दोन बंधारे आणि एक पूल पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, एकीकडे सततच्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. तर दुसरीकडे शेरीनाल्याचे दूषित आणि फेसाळ पाणी कृष्णेच्या पात्रात मिसळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कृष्णा नदीवर मोठा फेस दिसून येत आहे. परिणामी सांगलीकरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button