breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांची प्रकृती चिंताजनक

लखनऊ – समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. आझम खान आणि त्यांच्या मुलाला 9 मे रोजी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या मुलाची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

आझम खान यांच्या बाय लॅटरल लंग्जमध्ये कोरोना निमोनियाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. 2 दिवसानंतर त्यांचा आजार बळावल्यानंतर आणि ऑक्सिजनची गरज अधिक वाढल्यानंतर कोविड वॉर्डातील ICU मध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे.

आझम खान सध्या उत्तर प्रदेशातील सीतापूर तुरुंगात कैद आहेत. त्यांच्यावर 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. आझम खानसोबत तुरुंगात कैद आणखी 13 कैद्यांनाही कोरोना संसर्ग झाल्याचं नुकतंच समोर आलं होतं.

दरम्यान, आझम खान तुरुंगातही रमझानचे रोजे ठेवत होता. मात्र प्रकृती बिघडल्यानंतर आझम खान यांनी रोजे ठेवणेही बंद केल्याची माहिती तुरुंग प्रशासनाने दिली होती. आज त्यांची ऑक्सिजनची गरज कमी झाली. ते जेवणही करत आहेत. मात्र त्यांना संसर्ग अधिक आहे. त्यावेळी आझम खान यांच्यासाठी पुढील 72 तास महत्वाचे आहे. या काळात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली तर पुन्हा चिंता नसेल, असं डॉक्टरांनी म्हटलंय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button