breaking-newsTOP Newsक्रिडा

IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरच्या पहिल्या विकेटवर सचिनची हटके प्रतिक्रिया; म्हणाला..

IPL 2023 : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने यंदाच्या आयपीएलमध्ये पदार्पन केले आहे. त्याने दुसऱ्या सामन्यात आयपीएलची पहिली विकेटही घेतली आहे. दरम्यान, आका या विकेटवर सचिन तेंडुलकरने प्रतिक्रिया दिली आहे.

सनराइजर्स हैदराबाद विरूद्धच्या सनराइजर्स हैदराबाद संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात २० धावांची गरज होती. तर त्यांच्या दोन विकेट शिल्लक होत्या. अशा परिस्थितीत मुंबईचा कर्णधार रोहितने अर्जुनला गोलंदाजी करण्यास सांगितले. आयपीएलमधील दुसरा सामना खेळणाऱ्या अर्जुनने या षटकात फक्त ५ धावा देत मुंबईला सामना जिंकुन दिला. अर्जुनने या षटकात भुवनेश्वारला बाद करत आपली आयपीएलमधील पहिली विकेट घेतली.

प्रत्येक सामन्याप्रमाणे या सामन्यानंतरही मुंबई इंडियन्स संघाने ड्रेसिंग रूममध्ये आपल्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव केला. संघाचा हा सलग तिसरा विजय ठरला आणि या विजयानंतर सर्वेत्ताम षटक टाकल्याबद्दल प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी अर्जुनचे कौतुक केले. यासोबतच अर्जुनचे वडील सचिन यांनीही त्याला बिल्ला लावला.

अर्जुनच्या जर्सीवर बिल्ला लावल्यानंतर सचिनने त्याचा चांगलाच समाचार घेतला. सचिन म्हणाला की, आता निदान आमच्या कुटुंबात तरी विकेट आली आहे.

अर्जुनने घेतलेली पहिली आयपीएल विकेट आणखी एका खास कारणासाठी आहे. त्याने भुवनेश्वरला बाद केले. आणि रणजी ट्रॉफीमध्ये सचिनला शून्यावर बाद करणारा भुवनेश्वर हा पहिला गोलंदाज होता. २००९ साली भुवनेश्वरने हा पराक्रम केला होता. त्यावेळी तो १९ वर्षाचा होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button