breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘भाजप आमदारांना शास्तीची धास्ती’ तर, ‘शिवसेना खासदारांना युतीसाठी भिती’

  • भाजपच्या भर सभेत आमदार चाबुकस्वारांचा झाला अपमान
  • तरीही, भाजपला प्रत्युत्तर देण्यास शिवसेनेने दिला नकार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मुख्यमंत्र्यांच्या सभेत नागरिकांच्या प्रश्नांवर बोलण्याची संधी नाकारल्याने आमदार चाबुकस्वारांचा भर सभेत अपमान झाला. वास्तविक पाहता हा चाबुकस्वारांचा अपमान नसून शिवसेनेची मान शरमेने खाली जाण्याचा प्रकार आहे. एरव्ही राज्याच्या मंत्रीमंडळात भाजपच्या विरोधात तांडव घालणारी शिवसेना पिंपरी-चिंचवड शहरात नामोहरम झाल्याची दिसते. खासदार बारणे यांनी स्वतःच्या कर्तव्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत देखील बारणे आणि चाबुकस्वार यांनी भाजपच्या विरोधात त्यांच्या सापत्न वागणुकीवर भाष्य केले नाही. यावरून बारणे आणि चाबुकस्वारांना शिवसेना-भाजप युतीची उत्कंठा लागल्याचे दिसते. आपल्या बोलण्यामुळे युतीला ठेच पोहोचेल, अशी भीती मनात बाळगूनच त्यांनी भाजपवर टिपन्नी देण्यास टाळल्याचे दिसते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन आणि आयुक्तालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (दि. 9) झाले. या कार्यक्रमावर महापालिकेतील शिवसेनेने बहिष्कार टाकलेला असताना शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांनी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या बाजुचे आसन पकडले. या आमदारांना कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देखील देण्याचा सदाचार भाजप पदाधिका-यांनी दाखविला नाही. त्यातच भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी शहरातील नागरिकांना भेडसावणारा शास्ती कराचा प्रश्न सोडविण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. दरम्यान, आमदार चाबुकस्वारांना बोलण्यास परवानगी दिली नाही. विशेष म्हणजे नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्याकडे याचना करावी लागली. तरी देखील त्यांना बोलण्याचा मान मिळाला नाही. भाजपच्या व्यासपीठावरील भर सभेत त्यांना असा अपमान सहन करावा लागला.

आमदार चाबुकस्वारांचा आपमान हा त्यांचा व्यक्तीगत आपमान नसून राज्यातील प्रश्नांवरून मुख्यमंत्र्यांसह भाजपवर धारातीर्थी पडणा-या शिवसेनेचा अपमान आहे. जर, राज्याच्या मंत्रीमंडळात शिवसेना भाजप विरोधात अकांडतांडव करत असेल तर या अपमानास्पद वागणुकीवर पिंपरी-चिंचवडमधील शिवसेनेच्या वाघांनी शेपूट का घातले, असा प्रश्न काही शिवसैनिकांना पडला आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांनी आज त्यांच्या कार्यकिर्दीची माहिती देण्यासाठी महपालिकेत पत्रकार परिषद घेतली. याबाबत त्यांना विचारण्यातही आले. मात्र, त्यांनी बोलण्यास नकार देत मुख्यमंत्र्यांच्या शब्दांचा सूर पकडून भाजपच्या सापत्न भावाच्या वागणुकीचा वचपा काढण्यास माघार घेतली. आमदार चाबुकस्वारांनीही चक्कार शब्द विरोधात न बोलता बोलणे आटोपते घेतले. खुद्द आमदारांचा आपमान होत असताना शहरातील शिवसेना शांत बसतेच कशी, असा प्रश्न कट्टर शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे.

शास्तीच्या मुद्यावरून भाजपच्या सुरात सूर

भाजपच्या दोन्ही आमदारांनी शास्तीची धास्ती घेतल्याचे कार्यक्रमात कबुल केले असतानाच येत्या पंधरा दिवसांत यावर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यावर शिवसेना खासदार बारणे यांनी आरोप केले नसले तरी, शास्ती कर पूर्णपणे माफ करण्याची आमची मागणी असल्याचे सांगितले. या प्रश्नी आम्ही जनतेबरोबर असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, राजकीय भाष्य करणे त्यांनी तार्कीक पध्दतीने टाळले. एरव्ही भाजपच्या विरोधात बोलणारे बारणे आज भाजपच्या बाजुने बोलले. आपल्या बोलण्यामुळे युतीत खोडा बसू नये, म्हणूनच त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलणे टाळले असावे. त्यामुळे युतीबाबत खासदार बारणे आणि आमदार चाबुकस्वारांनी मनात भिती बाळगल्याचे दिसते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button