breaking-newsमहाराष्ट्र

नांदेडमध्ये मनसेच्या शहराध्यक्षाची आत्महत्या, राजकारणासाठी पैसे नसल्याने उचलले पाऊल

नांदेड – यापुढे  राजकारण करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही’ असं सांगून नांदेडमधील किनवटचे मनसे शहराध्यक्ष सुनिल ईरावार या 27 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली.

सुनिल ईरावार हे शहरातील गोकुंदा परिसरात राहत होते. सुनिल मनसेचे शहराध्यक्ष म्हणून काम पाहत होते. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास सुनिलने राहत्या घरात साडीने गळफास घेतला. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी जिवन यात्रा संपवली. सुनिलने आत्महत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

घरातील सदस्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सुनिलचा मृतदेह ताब्यात घेतला. घराची पाहणी केली असता सुनिलने आत्महत्येपूर्वी एक सुसाई़ड नोट लिहून ठेवली होती. या नोटमध्ये त्याने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफी मागितली.

अखेरचा जय महाराष्ट्र’

यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझे पुढील माझ्या मर्जीप्रमाणे संपवत आहे. तरी माझ्यामुळे कुणालाच त्रास देऊ नका.

राजसाहेब, मला माफ करा. आमच्या इथं पैसे आणि जात या दोन गोष्टींवर राजकारण आहे आणि दोन्हीही माझ्याजवळ नाही.

मी माफ करण्याच्या लायकीचा नाही

आई, पप्पा, काका, काकू, मोठी वहिणी, छोटी वहिणी, शिवादादा, शंकरदादा, पप्पूदादा, मला माहिती आहे मी माफ करण्याच्या लायकीचा नाही, तरी तुम्ही सर्वजण मला माफ करचाल अशी आशा बाळगतो.

माझ्या दैवताचा वाढदिवस

सुनिल हे राज ठाकरे यांचा कट्टर चाहते होते. त्यामुळेच ते मनसेत सहभागी झाले होते. बघता बघता त्यांना शहराध्यक्षाची जबाबदारी मिळाली. 14 जून रोजी राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ‘माझ्या दैवताचा वाढदिवस’ म्हणून त्याने राज यांचा वाढदिवस साजरा केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button