breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराजकारण

रशियाच्या संशोधन सहाय्यकाला जर्मनीत हेरगिरीप्रकरणी अटक

बर्लिन |

जर्मन विद्यापीठात काम करणाऱ्या रशियातील एका व्यक्तीला हेरगिरीच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. विद्यापीठातील माहिती रशियातील गुप्तचर यंत्रणेला पुरवत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे, असे जर्मनीतील अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. या संशयिताचे नाव इलनूर एन. असे असून त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्यानंतर तो काम करीत असलेल्या ठिकाणी आणि वास्तव्य करीत असलेल्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. जर्मन विद्यापीठामध्ये तो संशोधन सहाय्यक म्हणून काम करीत होता. विद्यापीठाचे नाव अथवा त्याला कोठून अटक करण्यात आली ते अधिकाऱ्यांनी सांगितले नाही.

रशियाच्या गुप्तचर यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीची त्याने किमान तीन वेळा भेट घेतली होती. रशियाच्या गुप्तचर यंत्रणेतील त्या व्यक्तीचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. आरोपीने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आणि या महिन्यात गुप्तचर यंत्रणेतील व्यक्तीची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन भेटींमध्ये आरोपीने विद्यापीठाशी संबंधित माहिती गुप्तचर यंत्रणेत काम करणाऱ्याला दिली आणि त्याच्या मोबदल्यात मोठी रक्कम वसूल केली असे सूत्रांचे म्हणणे आहे. न्यायमूर्तीनी त्याला कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button