breaking-newsमुंबई

RSS ही फॅसिस्ट संघटना – जावेद अख्तर

मुंबई – आरएसएस ही फॅसिस्ट संघटना आहे. त्यांच्या सर्व कार्यालयात गोळवलकर गुरूजी यांचे फोटो आहेत. याच आरएसएसला भारताचा तिरंगा मान्य नाही, राज्यघटनाही मान्य नाही. त्यांची बौद्धिक क्षमता एकदम खालच्या दर्जाची आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ पटकथाकार व लेखक जावेद अख्तर यांनी आरएसएसला लक्ष्य केले आहे.

भारतीय लष्करात देशाच्या वेगवेगळ्या प्रांताच्या रेजिमेंटस आहेत फक्त गुजरात रेजिमेंट नाही. ती नरेंद्र मोदींनी बनवावी, असा टोलाही त्यांनी मोदींना लगावला. जावेद अख्तर मुंबईतील कलेक्टिव्ह फोरमच्या कार्यक्रमात बोलत होते. अख्तर म्हणाले की, सैन्यात देशाच्या वेगवेगळ्या प्रांताचे रेजिमेंट्स आहेत. फक्त गुजरात रेजिमेंट नाही. नरेंद्र मोदी यांनी गुजरात रेजिमेंट बनवून सुरत, अहमदाबादमधील लोकांना गुजरात रेजिमेंटमध्ये भरती करावे.

काय काय म्हणाले जावेद अख्तर?

–  देशातील सेक्युलॅरिझमबद्दल बोलायचं झाल्यास ‘वन्स अपॉन ए टाईम’ असे म्हणावे लागेल.

– मोदीजींची छाती 56 इंच असल्याचे सांगितलं जातं पण या देशाला इंदिरा गांधींचं जे नेतृत्त्व लाभलं त्याला तोड नाही. मोदींजी आपण इंदिरा गांधींची बरोबरी करू शकत नाही. तुम्हाला अनेक जन्म घ्यावे लागतील इंदिरा गांधींच्या बरोबरी करायला. तुमच्या प्रत्येक गोष्टीत इंदिरा गांधी सरस आहेत.

– हिंदू कोड बिलात कालानुरूप बदल झाले पण मुस्लिम पर्सनल लॉमध्ये का झाले नाहीत?

– सरकारने काय चांगलं काम केलंय का…? यावर अख्तर म्हणाले की, खरं तर याच उत्तर नरेंद्र मोदींही देऊ शकत नाहीत..

– याचं कोणी जेलमध्ये गेलं होतं का? लालकृष्ण आडवाणी यांनी भारत छोडो ऐवजी आरएसएस ज्वाईन केली.

– ज्यांच्यावर गांधी हत्येचे आरोप झाले आहेत. त्यांचे पुतळा यांना बनवावा लागतोय. यांच्याकडे कुणीच आदर्श नाही म्हणून आरएसएसवर बंदी घालणा-या सरदार पटेलांचा यांना पुतळा उभारावा लागतोय.

– पाकिस्तान खुरापती काढणारा देश, मात्र मला पाक जनतेविषयी काही तक्रार नाही. त्या लोकांनाही आपल्याप्रमाणेच शांती हवी आहे. भारताशी चांगले संबंध हवे आहेत.

– सर्जिकल स्ट्राईक- रिअॅक्ट होणं महत्त्वाचं

– आमच्याकडे कधी कधी काही चित्रपट चालतात अशी यांची स्थिती

– काश्मिरी लोकांचे जर पाकिस्तानबरोबर किंवा इसिसबरोबर संबंध नसतील तर आम्ही त्यांच्यासाठी जीव ही देऊ…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button