breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमनोरंजन

बिनशर्त प्रेमाची थरारक कहाणी : शॉर्ट फिल्म ‘डॉल’ (एकदा नक्की पहा)

रे क्रिएशनची बहुप्रतिक्षीत शॉर्ट फिल्म प्रदर्शित, सर्व क्षेत्रांतून कौतुकाचा वर्षाव..!

पिंपरी । प्रतिनिधी

 शॉर्ट फिल्म्समधून केवळ मनोरंजनापेक्षा अनेकदा एखादा चांगला विचार देण्याचा प्रयत्न अनेकांनी केलेला आहे. जे या छोटय़ा माध्यमातून प्रभावीपणे करणं शक्य असतं. मोठया लांबीच्या चित्रपटांच्या फाफटपसा-यातून प्रेक्षकांपर्यंत नेमका तो संदेश, विचार कधीकधी पोहोचणं कठीण होतं. मात्र कमी वेळेत चपखल संवाद व दृश्ययोजना साध्य करणं निर्मात्याच्या हाती असतं. अशीच एक बहुचर्चित शॉर्ट फिल्म नुकतीच युट्युब वर Vishwakarma Av या यु ट्यूब चॅनल वर प्रदर्शित करण्यात आली आहे. “डॉल – द अनकंडिशनल लव्ह” असं या थरारक अनुभव देणाऱ्या गूढ शॉर्ट फिल्मचे नाव आहे.

विश्वकर्मा एव्ही यांनी दिग्दर्शित केलेल्या या शॉर्ट फिल्मची निर्मिती रे क्रिएशन या नामांकित प्रसिद्धी मीडिया ग्रुपच्या किरण जोगदंड व अविनाश आदक यांनी केली आहे. प्रेमाच्या विविध पैलूंचे दर्शन घडवणारा हा थरारक अनुभव गुढरित्या प्रेक्षकांसमोर मांडण्याचा चपखलपणे प्रयत्न “डॉल” च्या माध्यमातून यशस्वीरीत्या केल्याचे दिसून येते.  सस्पेंस, थ्रिलर आणि लव्हस्टोरी या बाजाची  ‘डॉल’ प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. डॉल य शॉर्ट फिल्ममधे प्रसाद खैरे, प्राजक्ता इटकर, प्रतीक गंधे, रोहित पवार,  नेहा धावसे, चिराग चौधरी यांनी प्रमुख भूमिका साकारली असून कथा आणि दिग्दर्शन विश्वकर्मा एव्ही यांनी केले आहे. संगीत दिग्दर्शन मनोज शिंगुस्ते यांचं असून रे क्रिएशन यांची हि निर्मिती आहे.

    सर्वच कलाकारांचा सर्वोत्तम अभिनय आणि आधुनिकरित्या करण्यात आलेले चित्रीकरण हा या शॉर्ट फिल्मचे यूएसपी ठरतात. सुमारे अर्धा तास प्रेक्षकांना चित्रपटामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी या चित्रपटाचे ‘बॅकग्राऊंड म्युझिक’ आणि ‘ड्रोन’च्या मदतीने टिपलेले काही सीन्स बाजी मारून जातात.

  शॉर्ट फिल्म साठी ‘सस्पेन्स थ्रिलर’ हा अगदीच अवघड आणि क्वचित निवडला जाणारा प्रकार आहे. त्यामुळे रसिक म्हणून तुम्हांला हा विषय आवडत असेल तर ‘डॉल’ एकदा पाहणं मुळीच चुकवू नका. हि शॉर्ट फिल्म पाहताना प्रेक्षक म्हणून तुमच्याही मेंदूला चालना देण्याचा यशस्वी प्रयत्न डॉल नक्कीच करेल.  

काय आहे “डॉल” ची कहाणी ?

एकमेकांवर प्रेम करणार एक तरुण जोडपं. जे लग्न करून एकत्र नांदू शकलं  नाही, आणि त्यांचंच प्रेम त्यांच्या विरहाचं कारण बनून कित्येकांचे आयुष्ये उध्वस्त करते याचीच कहाणी आहे “डॉल” चित्रपटाच्य सुरवातीलाच चित्रपटाचा नायक प्रसाद (प्रसाद खैरे) रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसतो, आणि मग सुरु होतो त्याच्या बिनशर्त प्रेमाचा त्याच्या मृत्यू पर्यंतचा थरारक प्रवास. प्रतीकात्मक “डॉल” ची भूमिका साकारणारी प्राजक्ता इटकरच्या अभिनयाने या सॉर्ट फिल्मच्या सस्पेन्स थ्रिलर या आयामाला ला नव्या उंचीवर नेऊन ठेवलंय. सर्वच कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांमधून चांगली दाद मिळत आहे.

शॉर्ट फिल्म लिंक : https://youtu.be/Cn7K-znxPhI

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button