breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: नागपूर पोलीस म्हणतात…जब तक ये खेल खतम नहीं होता अपुन इधरीच है!

सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमध्ये गणेश गायतोंडेचा एक संवाद होता. जब तक ये खेल खतम नहीं होता अपुन इधरीच है! हाच डायलॉग पोस्ट करत नागपूर पोलिसांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत पोलीस मास्क लावून काम करताना दिसत आहेत. तसंच या फोटोवर सेक्रेड ड्युटी असं लिहिण्यात आलं आहे. करोना देशातून घालवण्यासाठी प्रत्येकच जण सज्ज झाला आहे. यामध्ये पोलीसही मागे नाहीत. मास्क लावून ते त्यांचं कर्तव्य बजावत आहेत. नागपूर पोलिसांनी ट्विट केलेला हा फोटो आणि त्यावरच्या ओळी या सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहेत.

करोनाशी दोन हात करण्यासाठी महाराष्ट्र आणि देश सज्ज झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रोजच गरज असेल तरच बाहेर पडा असं आवाहन करत आहेत. अत्यावश्यक सेवा बंद करण्यात आलेल्या नाहीत. तसंच करोनाशी लढा द्यायचा असेल तर स्वतःची जास्तीत जास्त काळजी घ्या.

घराबाहेर पडू नका असं आवाहन केंद्र आणि राज्य सरकारतर्फे केलं जातं आहे. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचाही पर्याय दिला आहे. पोलिसांना मात्र वर्क फ्रॉम होम शक्य नाही. त्यामुळे ते कर्तव्य बजावत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठीही सजग रहात आहेत. अशात नागपूर पोलिसांनी पोस्ट केलेल्या या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. सेक्रेड ड्युटी अर्थात.. कर्तव्य आम्हाला पवित्र आहे या आशायचा हा मजकूर फोटोवर लिहिण्यात आला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button