breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

‘आरपीआय’ आठवले गटाचा निर्धार : अश्विनी जगताप यांना एक लाखाचे मताधिक्य देणार!

  • दिवंगत जगताप यांच्यामुळेच स्थायी समिती सभापतीपदी मागासवर्गीय महिलांना संधी

पिंपरी : दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी पिंपरी-चिंचवडमधील दीन-दलित, वंचित नागरिकांना नेहमीच मदत केली. दरवर्षी महाआरोग्य शिबीर भरवून गोरगरीबांच्या आरोग्यासाठी मोठे काम केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता येताच भाऊंनी मागासवर्गीय समाजातील दोन महिलांना स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीचे सभापतीपद दिले. आजपर्यंत कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्याने केले नाही ते लक्ष्मणभाऊंनी करून दाखवले. त्यांचा वारसा पुढेही चालू ठेवण्यासाठी चिंचवड पोटनिवडणुकीत अश्विनी लक्ष्मण जगताप यांना एक लाखाच्या मताधिक्याने विजयी करून त्यांना खऱ्या अर्थाने आपण श्रद्धांजली अर्पण करूया, अशा भावना रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक नेत्यांनी व्यक्त केल्या.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ आरपीआयच्या (आठवले गट) पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, आरपीआयच्या राज्याच्या नेत्या व माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, शहराध्यक्ष स्वप्निल कांबळे, बाळासाहेब भागवत, कुणाल वाव्हळकर, ईलाबाई ठोसर, कमल कांबळे, रुक्मिणी पाटील, बाळासाहेब रोकडे, गौतम गायकवाड, श्रीमंत शिवशरण, शाहरुख खान, सुजित कांबळे, दुर्गाप्पा देवकर, बाळासाहेब शिंदे, विनोद चांदमारे, रेखा काणेकर, अश्विन खुडे, योगेश भोसले, किरण समिंदर, आशिष थोरात, स्वप्निल कसबे, अविनाश शिरसाठ आदी उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब भागवत, ईलाबाई ठोसर, कमल कांबळे, रुक्मिणी पाटील, स्वप्नील कांबळे, बाळासाहेब रोकडे, गौतम गायकवाड, श्रीमंत शिवशरण यांनीही मार्गदर्शन केले.

अन्य नेते, पक्षांना जमले नाही…लक्ष्मण भाऊंनी करुन दाखवले…
आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे म्हणाल्या, “दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप हे असे एकमवे नेते होते की ज्यांनी नेहमीच शहरातील मागासवर्गीयांचा विचार केला. मागासवर्गीयांना नेहमीच मदत केली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवली. त्यावेळी लक्ष्मणभाऊ यांनी मला मोठी मदत केली. या निवडणुकीत माझा निसटता पराभव झाला. पण लक्ष्मणभाऊ यांच्यामुळेच मी विजयापर्यंत पोहोचू शकले. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपचा सत्ता येताच महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या सलग दोन वर्षे मागासवर्गीय महिला नगरसेविकांच्या हाती दिले. दोन मागासवर्गीय महिला नगरसेविकांना स्थायी समितीचे सभापतीपद दिले. आजपर्यंत एकाही पक्षाला आणि एकाही नेत्याला जमले नाही ते लक्ष्मणभाऊ जगताप यांनी करून दाखवले. दरवर्षी महाआरोग्य शिबीराचे आयोजन करून गोरगरीबांच्या आरोग्याची ते काळजी घेत होते. अशा या लोकनेत्याला देवाने आपल्यातून लवकर हिरावून नेले. त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना पोटनिवडणुकीत आपण एक लाखाचे मताधिक्य देऊन लक्ष्मणभाऊंना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करूयात, असे त्यांनी सांगितले.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button