breaking-newsमुंबई

राज्यराणी एक्सप्रेसवर दगडफेक, मोटरमनच्या डोळ्यात घुसली काच

छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून नाशिककडे निघालेल्या राज्यराणी एक्स्प्रेसवर अज्ञाताने दगड भिरकावल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या घटनेत इंजिनाची काच फुटून तिचा तुकडा मोटरमनच्या डोळ्यात घुसला, त्यामुळे मोटरमन जखमी झाला.

मंगळवारी (4 डिसेंबर) रोजी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली. नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या राज्यराणी एक्सप्रेसवर मध्य रेल्वेच्या वासिंद आणि आटगाव स्थानकादरम्यान दगड फिरकावण्यात आला. त्यामुळे इंजिनची काच फुटली आणि ती काच केबिनमधल्या मोटरमनच्या डोळ्यात गेली. जखमी झालेल्या मोटरमनने कसारा स्थानकावर एक्सप्रेस थांबवली, येथे मोटरमनवर प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर एक्सप्रेस नाशिककडे रवाना झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button